breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राज्यात भाजप-राष्ट्रवादी सत्तेत येताच शहरातील आमदारांना मंत्रीपदाची ‘स्वप्ने’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दर्षविल्याने आज सकाळी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात भाजप-राष्ट्रवादीची युती होऊन सरकार स्थापन्याचे निश्चित होताच पिपंरी-चिंचवडमधील भाजप आमदारांना, नेत्यांना मंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली आहेत.

अजित पवार यांनी जी भूमिका घेतली आहे. ती राष्ट्रवादीच्या विरोधात असून त्याला पक्षाचा पाठिंबा नसल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे रात्रीत निर्णय घेऊन सरकार स्थापन्याची व्युवरचना कितपत यशस्वी ठरेल याबाबत शंका आहे. असे असले तरी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपसह राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्री पदाची स्वप्ने पडू लागली आहेत. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सौहार्दपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे आपल्याला मंत्री पद मिळण्यात कसलाच अडथळा नसल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

तर, पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आण्णा बनसोडे यांनी काहीही झाले तरी अजित पवार यांच्यासोबतच राहण्याची भूमिका घेतली आहे. पक्षाची ध्येयधोरणे आणि शरद पवार यांना माननारा शहरातील वर्ग आमदार बनसोडे यांची भूमिका मान्य करेल काय, असा प्रश्न आहे. परंतु, बनसोडे यांना सुध्दा अजित दादांकडून एखाद्या मंत्रीपदाची लॉट्री लागण्याची आपेक्षा दिसते. त्यामुळेच त्यांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सोडून अजितदादांसोबत कायम राण्याची भूमिका घेतल्याचे दिसते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button