breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राज्यमंत्री बाळा भेगडेंचा 1 लाख 16 हजार मतांनी पराभव, सुनील शेळकेंचा दणका

  • भाजपचा बालेकिल्ला झाला उध्वस्त
  • राष्ट्रवादी कॉंग्रेसची टिकटिक सुरू

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या मावळ विधानसभा मतदार संघात भाजपचे राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. राष्ट्रवादीची उमेदवारी घेतलेले सुनील शेळके यांनी तब्बल 1 लाख 16 हजार मतांनी भेगडेंचा पराभव केला आहे.

बाळा भेगडे सलग तीनवेळा मावळ लोकसभा मतदार संघातून निवडून आले. भाजपने त्यांना राज्यमंत्री पद दिले होते. राज्यात भाजपची सत्ता असल्याने यावेळी देखील त्यांचाच विजय होणार, असा आत्मविश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांना होता. मात्र, राष्ट्रवादीचे उमेदवार शेळके यांच्या झंझावाताने मावळचे वातावरण फिरले होते. आज शेळकेंनी तब्बल 1 लाख 16 हजार मतांनी बाळा भेगडेंचा पराभव केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button