राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त प्रबोधन पर्वाचे आयोजन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/SHAHU-JI-MAHARAJ.jpg)
- शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होणार
पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त त्याच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.
शाहूनगर येथील सदाशिव बहिरवाडे क्रिडांगणावर बुधवार दि.२६ ते २७ या कालावधीत विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याचा शुभारंभ बुधवार दि.२६ रोजी महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.
बुधवार दि. २६ जून २०१९ रोजी सकाळी १० वाजता के.एस.बी. चौक येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता कै. सदाशिव बहिरवाडे क्रिडांगणात महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते प्रबोधन पर्वाचे उद्द्घाटन करण्यात येणार आहे.
सायंकाळी ६.०० वाजता कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध शाहीर रंगराव पाटील हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन व कार्य यावर आधारित शाहीरी सादर करतील. रात्री ८.०० वाजता ख्यातनाम सिने अभिनेते राहुल सोलापूरकर निर्मित अग्निदिव्य हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित नाटक सादर होणार आहे.
गुरुवार दि. २७ जून २०१९ रोजी कोल्हापूर येथील मिलिंद सावंत आणि त्यांचे सहकारी मर्दानी खेळ सादर करणार आहेत. त्यामध्ये प्राचीन काळातील तलवार, दांडपट्टा आदि शस्त्रांची माहिती व प्रात्यक्षिके सादर होणार आहे. या कार्यक्रमास शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहावे असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले आहे.