breaking-newsपिंपरी / चिंचवड

रहाटणीत करोनावर मात, वाढदिवसाचा खर्च टाळून केले ‘मास्क’ वाटप

  • ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत (अण्णा) नखाते यांचा पुढाकार
  • विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षा घेण्याचे केले आवाहन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता पिंपरी-चिंचवडमधील राजकीय पुढा-यांनी देखील सुरक्षा बळगण्याचा संदेश प्रभागातील नागरिकांना दिला आहे. रहाटणी प्रभाग क्रमांक 27 चे ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत (अण्णा) नखाते यांनी नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. स्वतःच्या वाढदिवसावर होणारा लाखो रुपयांचा खर्च टाळून त्यांनी पिंपरी-चिंचवड मनपा शाळा क्रमांक 55 मधील विद्यार्थ्यांना तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना मास्क वाटप केले आहेत.

चार दिवसांपूर्वी करोना व्हायरसचा पिंपरी-चिंचवडमध्ये शिरकाव झाला. पिंपरी-चिंचवडमध्ये करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याने तीन रुग्ण पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आयसोलेशन कक्षामध्ये उपचार घेत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन कसोशिने प्रयत्न करत आहे. वैद्यकीय विभागातील डॉक्टरांचे तपासणी पथक तयार केले आहे. त्यामुळे करोना विषाणुला घाबरण्याचे कारण नाही. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हा एक मात्र उपाय शिल्लक आहे. त्यामुळे सोसायट्या, कॉलनी, वस्ती भागात राहणा-या नागरिकांनी वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, घराबाहेर पडताना मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, हस्तांदोलन न करणे या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात, असे आवाहन नगरसेवक नखाते यांनी केले आहे.

वाढदिवसाचा खर्च टाळून मास्क वाटप

रहाटणी येथील ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत (अण्णा) नखाते यांचा 12 मार्च रोजी वाढदिवस साजरा केला जातो. मात्र, यावर्षी शहरावर किंबहुना देशावर करोनाचे संकट आहे. ही आपत्ती ओळखून नखाते यांनी आपल्या वाढदिवसाचा होणारा लाखो रुपयांचा खर्च टाळून त्या पैशातून प्रभागातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, सोसायट्यांमधील रहिवाशांना मास्क वाटप केले आहेत. या विधायक कार्यामुळे नखाते यांचे कौतुक होत आहे.

शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची सुरक्षा घेणे गरजेचे आहे. ही आपत्तीजन्य परिस्थिती ओळखून मास्क वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला. या विषाणू व्हायरसपासून नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी सर्वांनी विधायक कार्य हाती घ्यावे. नागरिकांनी हस्तांदोलन करू नये, घराबाहेर पडताना प्रत्येकाने मास्क वापरावे, गर्दीच्या ठिकाणी एकत्र जाणे अवर्जून टाळावे.

चंद्रकांत (अण्णा) नखाते, ज्येष्ठ नगरसेवक, रहाटणी, प्रभाग 27

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button