रहाटणीतील गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघड, 40 सिलेंडर केले जप्त
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – सरासपणे सुरु असलेल्या गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी छावा संघटना आणि अन्न पुरवठा अधिकारी आज (गुरुवार) सकाळी रहाटणी येथील जनता स्टील सेंटर या भांड्याच्या दुकानावर धाड टाकून तब्बल ४० सिलेंडर जप्त केले.
या कारवाई दरम्यान, छावा संघटना पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमोल आण्णासाहेब वीर, छावा संघटना महाराष्ट्र सल्लागार मचिंन्द्र चिंचोले, राम सुर्यवंशी, अन्न पुरवठा अधिकारी दिनेश तावरे, एस.एम आंबोळे, जी.सोमवंशी, डि.व्ही.गणविरे, भावना वानखेडे, सुजाता जायभाये, श्रीराम गायकवाड, गणपत राजे उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडी-रहाटणी परिसरातील जनता स्टील या भांड्यांच्या दुकानामध्ये सरासपणे गॅसचा काळा बाजार सुरु असल्याची माहिती छावा संघटनेला मिळाली होती. याबाबत छावा संघटनेने जिल्हा अन्न पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यावर आज सकाळी पोलीस, अन्न पुरवठा अधिकारी, तसेच छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जनता स्टील या दुकानावर धाड टाकून प्रकार उघडकीस आणला. या कारवाईमध्ये दुकानातून छोटे मोठे असे तब्बल ४० गॅस सिलेंडर ताब्यात घेण्यात आले आहेत. वाकड पोलीस ठाण्यात जनता स्टील सेंटर या दुकानाच्या मालकासह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.