रयत विद्यार्थी विचार मंचतर्फे शिवाजी महाराजांची जयंती साजरी
पिंपरी |महाईन्यूज|
छत्रपती शिवाजी महाराज यांची रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. एच.ए. कंपनीसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अध्यक्ष धम्मराज साळवे यांचे हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी समाधान गायकवाड, कार्याध्यक्ष अंजना गायकवाड, महासचिव संतोष शिंदे, सचिव नीरज भालेराव, राज्य संघटक रोहित कांबळे सदस्य प्रीतम गायकवाड, उपाध्यक्ष संदेश पिसाळ उपस्थित होते.
यावेळी धम्मराज साळवे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे पर स्त्रियांचा आदर करत होते. याबाबतचा दाखल देताना ते म्हणाले, महाराजांच्या पुढे पाटलांची सुंदर सून नजराणा म्हणून पेश केली. त्यावेळी महाराजांनी त्या महिलेच्या पायाकडे पहिले. महाराज बोलले कि,आमची माता जर एवढी सुंदर असती तर आम्ही सुद्धा एवढे सुंदर असतो. शिवाजी महाराज खूप सुंदर होते परंतु त्यांनी नजराणा पेश केलेल्या महिलेमध्ये आपली माता पहिली. त्याचा आदर्श आजच्या युवकांनी घेतला पाहिजे. परस्रीला मातेसमान मानून आपण शिवरायांचे मावळे होऊन कोपर्डी खैरलांजी हिंगणघाट अशा होणाऱ्या घटनांना आळा बसवला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.