breaking-newsपिंपरी / चिंचवड

रयत विद्यार्थी मंचच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या संपर्क कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे व  खजिनदार संदेश पिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजास सलामी देऊन संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष  धम्मराज साळवे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी महासचिव संतोष शिंदे, कार्यध्यक्ष अंजना गायकवाड, सचिव नीरज भालेराव खजिनदार संदेश पिसाळ, उपाध्यक्ष रोहित कांबळे, सहसचिव भाग्यश्री आखाडे, पिंपरी चिंचवड शहर कमिटी अध्यक्ष महेश गायकवाड, समाधान गायकवाड, राहुल थोरात, विकास डावरे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button