breaking-newsपिंपरी / चिंचवड

रमाबाईंनी भौतिक सुखाचा हव्यास कधी धरला नाही – अरुण चाबुकस्वार

पिंपरी | महाई्न्यूज | प्रतिनिधी

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रमाबाई आंबेडकर जयंती साजरी केली. रमाबाई यांच्या प्रतिमेस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार, पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, विजय हरके, विभा जुराहणी तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

यावेळी अरुण चाबुकस्वार म्हणाले की, रंजल्या-गांजल्यांची, दीन-दलितांची आई रमाई यांनी अनेक हाल अपेष्टा उपासमार सहन करून कोणत्याही भौतिक सुखाचा हव्यास धरला नाही. त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेले. बाबासाहेबांची समाजाप्रती तळमळ पाहुन त्यांच्यामागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. याची जाणीव आज प्रत्येकाला असली पाहिजे. यावेळी सुरेश भालेराव ह्यांनी देखील महामाता रमाबाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक पैलूंवर आपले मनोगत व्यक्त केले. 

प्राची खाडे यांनी सूत्रसंचालन केले. तर, नेहा कोटेचा यांनी पाहुण्यांचे आभार मानले.  

रमाबाईंचे गुण अंगी बाळगले पाहिजेत – चाबुकस्वार

रमाबाईंची सहनशीलता, सोज्वळता त्यागी व वात्सल्यवृत्ती, कष्ट, कामसू निर्मळपणा, स्वाभिमानी इ. गुणांचा आदर करून हे गुण आपल्या अंगी बाळगले पाहिजेत. त्याचप्रमाणे कठीण परीस्थितीवर मात करून कसे जीवन जगावे आणि फक्त जीवन जगणे नाही तर ते आनंदाने व समाधानाने कसे जगावे हा आर्दश घेतला पाहिजे.” असे अरुण चाबूकस्वार यांनी म्हटले. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button