Breaking-newsपिंपरी / चिंचवड
युवासेनेतर्फे इयत्ता दहाविच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/IMG-20200224-WA0008.jpg)
पिंपरी – पिंपरी युवासेनेतर्फे मीनाताई बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयमध्ये 10 वीच्या विद्यार्थीसाठी प्रा. संतोष पाचपुते ह्यांचे व्याख्यान आयोजन केले होते.
परीक्षेच्या काळात कोणत्याही गोष्टीचा ताण न घेता विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. इंग्लिश, गणित, विज्ञान ह्या विषयी भीती बाळगू नये. आणि परीक्षाकाळातील अभ्यासचे नियोजन आणि महत्वाचे विषयाचे टिप्स प्रा. पाचपुते ह्यांनी दिल्या.
यावेळी मुख्यध्यापिका पानसरे,सामाजिक कार्यकर्ते नंदू काची, अविनाश जाधव, भालेराव, माने, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन युवासेना विभागसंघटक निलेश हाके यांनी केले होते.