Breaking-newsपिंपरी / चिंचवड
मोरवाडीतील रस्त्याचे ‘उमेश जोगळेकर पथ’ असे नामकरण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/9c9445c0762d59cc21269e86018d1c66_XL.jpg)
पिंपरी – मोरवाडी येथील श्रद्धा गार्डन ते जेकुमा टूल्स अँड गेजेसपर्यत रस्त्याचे ‘कै. उमेश जोगळेकर पथ’ असे, तर उमा प्लास्टिक कँपनी समोरील चौकाचे उद्योजक कै. बळवंत जेजुरीकर चौक असे नामकरण करण्यात आले. या नामफलकाचे अनावर रविवारी (दि.10) अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते व माजी महापौर आझम पानसरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, नगरसेवक केशव घोळवे, शैलेश मोरे, बाबू नायर, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, नोव्हेल ग्रूप ऑफ इंस्टीट्यटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, सुनील कदम, राजू सावंत निहाल पानसरे, अण्णा लुकर, महापालिकेचे अधिकारी शेखर साळवी, दीपक भोजने आदी उपस्थित होते.
अनुराधा गोरखे यांच्या पुढाकारातून प्रभाग समितीच्या बैठकीत श्रध्दा गार्डन येथील रस्त्याला कै उमेश जोगळेकर पथ असे नामकरण, तसेच मोरवाडी येथील जेकोमा इंडस्ट्रीस येथील चौकाला उद्योजक कै बळवंत जेजुरीकर असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार हे नामकरण करण्यात आले. जोगळेकर यांचे फिटनेसविषयीचे कार्य प्रसिध्द असून जिम प्रशिक्षक म्हणून त्यांनी शहरात योगदान दिले होते. तर, जेजुरीकर हे पिंपरी-चिचंवड शहरातील प्रसिद्ध उद्योजक होते. त्यांना महापालिकेचा उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार मिळाला होता. ते जेकुमा कंपनीचे संस्थापक होते.