मोरवाडीतील चिटफंड व्यावसायिकाचे अपहरण करून खून
![Murder by kidnapping of chit fund trader in Morwadi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/आनंद-उनावने.jpg)
पिंपरी : मोरवाडीतील चिटफंड व्यावसायिकाचे अपहरण करून खुन करण्यात आला असल्याचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आलेला आहे. आनंद साहेबराव उनावणे (वय ४५, राहणार नर्मदा बिल्डींग, म्हाडा कॉलनी, पिंपरी) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
पोलिसांनी आनंद उनावणे यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल न करता केवळ बेपत्ता असल्याची फिर्याद घेतली, असा आरोप मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केलेला आहे. विष्णू उनावणे यांनी ४ फेब्रुवारीला पिंपरी पोलीस ठाण्यात भाऊ आनंद हे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.
पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिटफंड व्यवसायिक आनंद हे बेपत्ता असल्याची माहिती भावाने पोलिसांना दिली होती. त्यानुसार बेपत्ता असल्याची फिर्याद पोलिसांनी दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आनंद यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढले. मिळालेला लोकेशन नुसार शोध घेण्याचा प्रयत्न केला. शोध सुरू असतानाच महाड पोलिसांकडून एक अनोळखी मृतदेह आढल्याची माहिती मिळाली. महाड पोलिसांनी पाठवलेले फोटो आणि बेपत्ता आनंद यांचे फोटो मिळतेजुळते वाटल्याने पोलीस पथकासह आनंद यांच्या नातेवाईकांना महाड येथे पाठविले. नातेवाईकांनी मृतदेह आनंद यांचाच असल्याचे सांगितले.