breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मॉडर्नमध्ये रंगली सूरमयी दिवाळी पहाट

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न शैक्षणिक संकुल निगडी, दीपोत्सव सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने यमुनानगरमध्ये रंगलेल्या दिवाळी पहाट व दीपोत्सव कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी रवींद्र शाळू, पल्लवी आनदेव आणि रुपाली घोगरे या कलाकारांनी सादर केलेल्या गीतांमुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली.  मराठी हिंदी बहारदार गाण्यांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. यावेळी निवेदक महेश गायकवाड यांनी आपल्या खुमासदार निवेदनातून विशेष रंगत आणली.

याप्रसंगी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपकार्यवाह शरद इनामदार, प्राचार्य सतीश गवळी, प्रवीण तुपे, राजीव कुटे, स्थानिक नगरसदस्या सुमन पवळे, कमल घोलप, उत्तम केंदळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार उपस्थित होते. ‘स्वस्तिश्री गजानना’  या रुपाली घोगरे यांच्या गायनाने मैफल सुरु झाली. तर ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ ‘ऐरणीच्या देवा तुला’ या गीतांना रसिक श्रोत्यांनी टाळ्यांनी दाद दिली. तर रवींद्र शाळू यांनी ‘शुक्रतारा मंद वारा’ ओ हंसिनी, ऐ मेरी जोहराजबी’ या गीतांनी प्रेक्षकांना ठेका धरायला लावला. अनिल करमरकर यांनी सक्सोफोन या वाद्यावर  विविध गाणी सादर करून  विशेष दाद मिळविली. ‘रेशमांच्या रेघांनी’ ‘एैन दुपारी यमुनातीरी’ या रुपाली घोगरे व पल्लवी आनदेव यांच्या लावणीला स्त्रियांनी विशेष प्रतिसाद दिला. तर, कजरा मोहब्बतवाला’, ‘शारद सुंदर चंदेरी राती’ या गीताने श्रोत्यांना ठेका धरायला लावला. यावेळी हार्मोनियमवर मकरंद पंडित, तबला-ढोलकीवर विशाल गडरतवार, कीबोर्डवर सुनील जाधव, रिदम मशीनवर संजय खाडे यांनी साथ दिली.

कार्यक्रमात वर्षभरात राबविलेल्या आरोग्य शिबिरात केलेल्या विशेष कार्याबद्दल डॉ. शुभदा जोशी, नामदेव चाळके , संतोष अनिवसे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदकुमार कुलकर्णी, गजानन मांडवकर, अजय म्हाळसा, उल्हास तापकीर, मनोहर चौगुले, चंद्रकांत सुर्वे, ज्ञानेश्वर धस, लक्ष्मण गडेकर यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी अंबिके तर आभार विनायक पालकृतवार यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button