breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मेट्रो प्रकल्पाला पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रो असेच नामकरण करा

महापाैर उषा ढोरे यांच्याकडे मारुती भापकर यांची मागणी

पिंपरी |महाईन्यूज|

महामेट्रो प्रकल्पातंर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात प्रकल्पाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. त्या प्रकल्पास पुणे मेट्रो असे नामकरण करण्यात आल्याने महापाैर उषा ढोरे यांना नाराजी देखील व्यक्त केलेली आहे. दरम्यान, महामेट्रोला पुणे पिंपरी चिंचवड असे नामकरण करावे, अशी मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.

महापाैर उषा ढोरे यांना भापकर यांना पत्र दिले असून त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात निगडी ते स्वारगेट मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु आहे. सुरुवातीला दापोडी ते पिंपरी असा प्रकल्प होणार होता. मात्र हा प्रकल्प पिंपरी ऐवजी निगडी पर्यंत व्हावा असा आग्रह शहरवाशींयांचा होता, तशी मंजूरी मिळाली. आज शहरातील दोपोडी ते पिंपरीपर्यंत काही भागातच मेट्रोचे काम काही अंशी झालेले असताना नवीन वर्षाच्या पूर्वसध्येचा मुहूर्त साधत मेट्रोचे डबे रविवार दि.२९ रोजी शहरात दाखल झाले.

मेट्रो प्रकल्पाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना झाली. त्यांच्या काळात हा प्रकल्प पिंपरी पर्यंतच मंजूर होता. सन २०१७ ला महापालिकेत सत्तांत्तर झाले, भाजपाची सत्ता आली. पिंपरी ऐवजी निगडी पर्यंत या प्रकल्पाला मान्यता देण्याचे काम भाजपाने केले. असे असताना काल या मेट्रोच्या डब्याचे उद्योगनगरीत आपण तुता-या लावून ढोल ताशांचा गजर करुन श्रेयवादाच राजकारण केले. खरे तर दापोडी ते निगडी हा प्रकल्प पुर्ण नसताना हे तीन डबे दाखल झाले आहेत. आणखी तीन डबे पुढील दोन दिवसात येणार असे जाहीर केले आहे. प्रकल्प पुर्ण नसताना हे डबे आणून ते आपण डोक्यावर घेऊन मिरवणार आहात की काय ? असा प्रश्न निर्माण होतो.

या डब्यांचे पुजन करताना आपण या डब्यांवरील आच्छादन काढून पुजा करण्याचा आग्रह धरला मात्र, मेट्रो अधिका-यांनी त्याला मान्यता दिली नाही. त्यावर आपण मेट्रो मार्गावर डबे चढू देणार नाही व त्याची ट्रायलही घेऊ देणार नाही. जे करायचे ते पुण्यातच करा अशी भुमिका तुम्ही व सभापतींनी घेतली. नंतर मात्र आपण व सभापतींनी डब्यांवरील आच्छादन न काढताच पुजन केले त्यावेळी आपण पुणे मेट्रो ऐवजी पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो असे नामकरण व्हावे अशी मागणी केली. याचा अर्थ स्वारगेट ते निगडी या मेट्रो प्रकल्पाला पुणे मेट्रो असेच नाव देण्यात आलेले आहे. हे पिंपरी चिंचवड शहरातील सत्ताधारी पक्षाचे अपयशच आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या या निर्ष्क्रीयेतेचा जाहीर निषेध करीत आहोत.

तरी निगडी ते स्वारगेट राबविण्यात येणा-या मेट्रो प्रकल्पाला पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो असेच नामकरण झालेच पाहिजे, अशीही मागणी भापकर यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button