breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मेट्रोच्या मद्यधूंद कामगारांची दादागिरी, सभापतींनी दाखविला हिसका

  • महापालिकेच्या प्रवेश द्वारावरच कामगारांची दादागिरी
  • रस्ता बंदसाठी परवानगी घेतली नसल्याचे झाले उघड

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांच्यासोबत मध्यरात्री अरेरावी आणि मारहाण करण्याइतपत मजल गाठणा-या पुणे महामेट्रो व्यवस्थापनाच्या कर्मचा-यांचे प्रकरण मेट्रोच्या चांगलेच आंगलट आले आहे. या प्रकरणाचा महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी चौकशी अहवाल मागितला असून पुढील पंधरा दिवस पिंपरी ते दापोडी मेट्रोचे काम जाग्यात थांबविण्याचे आदेश मेट्रो व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत.

दापोडी ते पिंपरी पुणे मेट्रोचे काम सध्या सुरू आहे. मंगळवारी (दि. 9) मध्यरात्री स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी कामानिमित्त काही पत्रकारांसमवेत पिंपरी महापालिकेत येत होते. दरम्यान, पिंपरी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच मेट्रोच्या कर्मचा-यांनी रस्ता बंद केल्याचे निदर्शनास आले. सभापतींची गाडी पाहून मेट्रोचे कामगार आणि बाऊंसर त्याठिकाणी जमा झाले. सभापतींनी बंद रस्त्याबाबत विचारणा केली असता कामगारांनी अरेरावी करत त्यांच्याशी चांगलीच हुज्जत घातली. सभापतींनी केवळ एक मोटार महापालिकेत सोडण्याची विनंती केली. त्यावर मेट्रोच्या कामगारांनी आणि बाऊंसरनी मडिगेरी यांच्यासोबत चांगलाच हैदोस घातला. काही मिनिटांत त्याठिकाणी सुमारे पन्नास बाऊंसर जमा झाले. मडिगेरी आणि पत्रकारांसोबत शाब्दीक बाचाबाची करून हे प्रकरण पार हमरीतुमरीवर गेले. सभापती मडिगेरी यांनी मेट्रोचे काम पाहणा-या महापालिकेतील अधिका-यांना फोन केला. परंतु, त्यांचा फोन बंद होता. त्यांनी तत्काळ पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून माहिती सांगितली.

काही मिनीटांत पोलीस कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. परंतु, पोलिसांना सुध्दा हे प्रकरण अटोक्यात येत नव्हते. शेवटी कसेबसे प्रकरण मिटवून सभापतींची गाडी अलगद पुढे काढण्यात आली. ज्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात मेट्रोचे काम करण्याची परवानगी दिली. त्याच महापालिकेतील स्थायी समिती सभापतींना मेट्रोच्या कार्मचारी आणि बाऊंसरनी हुज्जत घातल्याने हे प्रकरण मेट्रोच्या चांगलेच अंगलट आले आहे. सभापती मडिगेरी यांनी आज स्थायी समिती सभेत महामेट्रोच्या कर्मचा-यांच्या कृत्याचा निषेध केला. त्यासह रात्रीच्या प्रकरणाचा चौकशी अहवाल मागवून घेण्याचे आदेश आयुक्त श्रावण हार्डीकर यांना दिले. त्यावर आयुक्तांनी तातडीने मेट्रोकडून तो अहवाल मागविला आहे. तसेच, पुढील पंधरा दिवस मेट्रोचे काम बंद ठेवण्याचे आदेश सभापतींनी मेट्रो व्यवस्थापनाला प्रशासनाकडून दिले आहेत.

पत्रकारांच्या जीविताला सुध्दा धोका…

महामेट्रोचे काम सुरू असल्यामुळे मध्यरात्री दोनच्यानंतर रस्ता बंद ठेवण्यात येत असल्याचे तेथील कामगारांनी सांगितले. परंतु, पुणे-मुंबई महामार्ग बंद ठेवण्यासाठी मेट्रोने पोलीस प्रशासन किंवा महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नाही. कोणत्याही प्रकारचे सूचना फलक अथवा रेड सिग्नल लावलेले नाहीत. शिवाय, पर्यायी रस्त्याची सोय करण्यासंदर्भात सूचना मेट्रो व्यवस्थानाकडून वाहतूक पोलिसांना दिलेल्या नाहीत. एवढा उर्मटपणा महामेट्रोच्या व्यवस्थापनाकडून का केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेच्या पदाधिका-यांना मारहाण झाली असती तर पुढे हे प्रकरण चिघळले असते. सोबत असलेल्या पत्रकारांच्या जीविताला सुध्दा धोका निर्माण झाला असता. त्यांच्याशी हुज्जत घालून महामेट्रोच्या कर्मचा-यांनी पिंपरीत येऊन नागपूर पॅटर्न दाखविला आहे. त्यावर सभापतींनी सुध्दा त्यांना पिंपरीचा हिसका दाखवून पंधरा दिवस कामबंद ठेवण्याचे आदेश सोडले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button