Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
मेट्रोच्या कामाचे सेफ्टी ऑडीट करा, अन्यथा तीव्र आंदोलन करु -विशाल वाकडकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/PHOTO-1-5.jpg)
मेट्रोच्या कामाचे सेफ्टी ऑडीट करा – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी
पिंपरी (महा ई न्युज ) – महापालिकेच्या हद्दीत सुरु असलेल्या महामेट्रोच्या कामाचे तज्ञ समिती किंवा त्रयस्त संस्थेमार्फत सेफ्टी ऑडीट आणि स्ट्रक्चरल ऑडीट करावे. त्याचा अहवाल सर्व नागरिकांसाठी वृत्तपत्रांतून प्रसिध्द करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली.
याबाबत महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महामेट्रोच्या अधिका-यांकडे पत्र देऊन केली आहे. वाकडकर यांनी महामेट्रोचे सुब्रम्हण्यम स्वामी यांना पत्र देताना वाकडकर यांच्या समवेत नगरसेविका उषा संजोग वाघेरे पाटील, निकिता कदम, नगरसेवक राजु बनसोडे, युवक कार्यकर्ते ऋषिकेश वाघेरे पाटील, कुणाल थोपटे, प्रतिक राजेंद्र साळुंखे, सचिन मोकाशी, आलोक गायकवाड, भागवत जवळकर, महेश किवळे, प्रशांत सपकाळ, विशाल पवार, धनंजय जगताप, धनाजी ताबे, सचिन मोरे आदी उपस्थित होते.
आयुक्तांना दिलेल्या पत्रात मागणी केली आहे की, पुणे – मुंबई महामार्गावर कासारवाडी येथे शनिवारी (दि. 5 जानेवारी) दुपारी पायलींग मशिन उलटल्यामुळे दुर्घटना घडली. याची तज्ञ समितीमार्फत चौकशी करावी तसेच पिंपरी चिंचवड मनपा हद्दीत सुरु असणा-या महामट्रोच्या कामाचे तज्ञ समिती किंवा त्रयस्त संस्थेमार्फत सेफ्टी ऑडीट आणि स्ट्रक्चरल ऑडीट करावे आणि त्याचा अहवाल सर्व नागरिकांसाठी वृत्तपत्रांतून प्रसिध्द करावा.
शनिवारी झालेल्या अपघातास जबाबदार असणा-या अधिका-यांवर, ठेकेदारांवर कडक कारवाई करावी. अशीही मागणी शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. जोपर्यंत सेफ्टी ऑडीट आणि स्ट्रक्चरल ऑडीटचा अहवाल जाहिर होत नाही तोपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील महामेट्रोचे पुर्ण काम थांबवावे. अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत म्हणून सुरक्षिततेसंबंधात उपाय योजना कराव्यात. नागरिकांच्या जिवीत व मालमत्तेचे नुकसान होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी अन्यथा पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.