मृत व्यक्तीची ओळख पटण्यासाठी दिघी पोलिसांचे आवाहन
![young man died due to gas gieser blast suffocating breath](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/death-186_201905235119.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
दिघी पोलिसांना आढळून आलेल्या अनोळखी जखमी व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्याची ओळख पटवणे मुष्कील झाले आहे. जर कोणाला खालील वर्णनाच्या व्यक्तीची ओळख पटल्यास दिघी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दिघी पोलिसांना आळंदी येथील देहूफाटा याठिकाणी श्रेयस मंगल कार्यालयासमोर 27 नोव्हेंबर 2019 रोजी जखमी अवस्थेत एक व्यक्ती आढळून आली. पोलिसांनी या व्यक्तीला पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
मृत व्यक्तीचे वर्णन
अंदाजे वय 35 (नाव व पत्ता माहीत नाही), बांधा मध्यम, रंगाने गहु वर्ण, उंची 5 फुट 6 इंच, चेहरा उभट, नाक सरळ, दाढी साधारण वाढलेली काळी व तुरळक पांढरी, डोक्याचे केस काळे, कपाळ सर्वसाधारण, मिशी जाड काळी असे वर्णन आहे. या वर्णनाची व्यक्ती कोणाला परिचयाची वाटल्यास दिघी पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन दिघी पोलिसांनी केले आहे.