breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मृत प्राण्यांना दफन करण्याच्या कामासाठी सव्वाकोटीची निविदा

पिंपरी, (महाईन्यूज) – शहरातील मृत जनावरांना दफन करण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. संस्थेद्वारे गाय, म्हैस, घोडा, गाढव आणि उंट मृत पावल्यास त्यांचे दफन केले जाणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने 1 कोटी 30 लाख रुपयांची निविदा प्रसिध्द केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत पाळीव प्राणी मृत पावल्यास त्यांचे दफन करणे मुश्कील होते. एका विशिष्ट ठिकाणी मृत प्राण्यांना दफन केले जाते. त्यामध्ये गाय, म्हैस, घोडा, गाढव, उंट अशे प्राणी मृत पावल्यास त्यांना दफन करण्यासाठी घेऊन जाणे सहज शक्य होत नाही. एखाद्या वाहनामध्ये अवजड मृत प्राण्याला वाहून नेहून त्याठिकाणी दफन करावे लागते. हे काम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे एक वर्षासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा प्रसिध्द केली आहे. निविदेची रक्कम 1 कोटी 30 लाख 79 हजार 40 एवढी आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button