Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ निगडीत युवती भाजपच्या वतीने कँडल मार्च
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/yuvati-bjp.jpg)
निगडी – अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) युवती भाजपच्या वतीने संभाजी चौक निगडी प्राधिकरण ते भेळ चौक निगडी प्राधिकरण पर्यंत रविवारी सायंकाळी कँडल मार्च काढण्यात आला.
उत्तर प्रदेशातील अलिगढजवळ १० हजार रूपयांच्या कर्जाच्या वादातून एका दोन वर्षाच्या निष्पाप बालिकेची अत्यंत क्रुरपणे हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ निगडी प्राधिकरण येथे पिंपरी-चिंचवड शहर युवती भाजपच्या तेजस्विनी कदम यांच्या नेतृत्वाखाली कँडल मार्च काढण्यात आला.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे सचिव अनुप मोरे, युवती, महिला, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. यावेळी मेणबत्ती, फलक हाती घेऊन सर्वांनी हत्येचा निषेध केला.