breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड येथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – नागरिकांना भेडसावणारे प्रश्न प्रलंबित ठेवून विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जात असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले यांनी पालिकेच्या या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. चिंचवड येथील या कार्यक्रमात त्यांनी उपस्थित न राहता भाजप सत्ताधा-यांचा निषेध केला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे उद्घाटन झाल्यानंतर चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास कामांचे ई-भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मात्र, विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. नागरिकांना भेडसावणारे प्रश्न प्रलंबीत ठेवून विकास कामांचा ढोंगीपणा अंगी बाळगलेल्या सत्ताधारी भाजपच्या कार्यक्रमात आम्ही काय म्हणून उपस्थित रहायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे व्यासपीठावर विरोधक उपस्थित नसल्याने त्याची चर्चा सभागृहात रंगली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button