मुंबई-पुण्यात smart helmets या पोर्टेबल थर्मोस्कॅनरच्या मदतीनं 2 तासात तब्बल 5-6 हजार लोकांच्या तापमानाची नोंद करणं शक्य
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/EdpTcovUEAAQEBd.jpg)
भारतातील सर्वाधिक रूग्णसंख्या महाराष्ट्राच्या मुंबई, पुणे शहरात आढळत आहे. आता मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग करण्यासाठी पालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा हाय टेक यंत्रांचा वापर करत आहे. दरम्यान मुंबई आणि पुणे शहरात आता smart helmets या पोर्टेबल थर्मोस्कॅनरच्या मदतीने लोकांचं तापमान पाहिलं जातं. मागील 4 महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये असलेल्या मुंबई, पुणे सारख्या शहरात कोरोनाचा फैलाव नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी आता स्मार्ट हेल्मेट्सने तपासणी करून लोकांना विलगीकरणात ठेवण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
स्मार्ट हेल्मेट्स हे यापूर्वी चीन, इटली, दुबई मध्ये लोकांचं तापमान पाहण्यासाठी वापरली जात असे. आता या प्रगत, टेक्नॉलॉनीजे सुसज्ज थर्मोस्कॅनरच्या मदतीने दाट लोकवस्तीच्या आणि झोपडपट्ट्यांच्या भागातील लोकांचं तापमान तपासलं जाणार आहे. थर्मो गनच्या तुलनेत ही स्मार्ट हेल्मेट्स अधिक वेगाने तापमान मोजण्यास मदत करत आहे.
भारतीय जैन संघटनेचे स्वयंसेवक आणि पालिका एकत्रितपणे मास स्क्रिनिंग करत आहे. या स्मार्ट हेल्मेटमुळे 2 तासात तब्बल 5-6 हजार लोकांच्या तापमानाची नोंद करणं शक्य होणार आहे.
अदययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवलेली ही इम्पोर्टेड हेल्मेट्स सुमारे 6 लाख किंमतीची आहे. आणि सध्या डिमांडमध्ये देखील आहेत. दरम्यान सध्या मुंबई आणि पुणे शहरामध्ये प्रत्येकी 2 हेल्मेट्स वापरली जात आहेत.