breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘मी तर भाजपचा निष्ठावंत नगरसेवक’, बेईमानी आपल्या रक्तात नाय !

  • नगरसेवक तुषार कामठे यांचे स्पष्टीकरण

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपळे निलख प्रभाग क्रमांक 26 मधील भाजपचे नगरसेवक तुषार कामठे आणि लागूनच असलेल्या प्रभाग 25 मधील राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे त्यांच्या भूमिकेबाबत साशंकता व्यक्त केली जाते. त्यासंदर्भात नगरसेवक कामठे यांनी ‘महाईन्यूज’शी बोलताना मार्मिक स्पष्टीकरण दिले. “मी तर भाजपचा निष्ठावंत नगरसेवक आहे. पक्षनिष्ठा हेच माझ्यासाठी सर्वकाही आहे”. विरोधी पक्षातील नगरसेवकांशी मैत्री असणे यात गैर काय?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे आणि भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांचे एकाच फ्लेक्सवर शुभेच्छांचे फोटो अनेकदा अनेक ठिकाणी झळकत असतात. त्यामुळे नगरसेवक कामठे आणि कलाटे यांच्या मैत्रीपूर्ण संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांना पाठिंबा दिल्याने मयुर कलाटे त्यांचे काम करत आहेत. मित्रत्वाच्या नात्याने कामठे देखील त्यांच्या मदतीला धावतील, असा अंदाज राजकीय क्षेत्रात वर्तविला जात आहे. त्यासंदर्भात ‘महाईन्यूज’ने नुकतेच वृत्तही प्रसिध्द केले. त्यासंदर्भात कामठे यांनी मार्मिक स्पष्टीकरण दिले आहे.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणं गैर नाही. एकाच फ्लेक्सवर दोघांचे फोटो झळकले असतीलही. कारण, कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यापासून थांबवता येत नसते. त्यामुळे आमच्या मैत्रीवर कोणाचाही आक्षेप नसावा. मी भाजपचा निष्ठावंत नगरसेवक आहे. पक्षनिष्ठा काय असते हे मला चांगले माहीत आहे. ती जपत असताना लोकांच्या हितासाठी कठोर भूमिका सुध्दा मी अनेकदा घेतली आहे. त्यामुळे इतर पक्षातील नगरसेवकांशी मैत्रीपूर्ण संबंध असणे यात गैर काहीही नाही. मी भाजपचा सच्चा कार्यकर्ता आहे. बेईमानी आपल्या रक्तात नाही, असे कामठे यांनी ‘महाईन्यूज’शी सुसंवाद साधताना म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button