breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मावळ तहसीलदारांची शिफारस दुदैवी – सीईओ डाॅ. अमोल होळकुंदे

पिंपरी |महाईन्यूज|

करोनासारख्या महामारीच्या काळामध्ये जिवाची पर्वा न करता स्पर्श हॉस्पीटल करोना बाधितांवर उपचार करत आहे. गेल्या महिनाभराच्या काळात अडीचशेहून अधिक करोना बाधितांवर यशस्वी उपचार करून त्यांचे प्राण आम्ही वाचविले. मात्र काही हितशत्रूंच्या हेकेखोरीपणामुळे तहसीलदारांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केलेली शिफारस दुदैवी असल्याचे मत स्पर्श हॉस्पीटलचे सीईओ डॉ. अमोल होळकुंदे यांनी व्यक्त केले आहे.

मावळचे तहसीलदार मधूसुदन बर्गे यांनी स्पर्श हॉस्पीटलवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याची शिफारस जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे होळकुंदे यांनी आपले मत मांडले आहे. प्रसिद्धीपत्रकात होळकुंदे यांनी म्हटले आहे की, स्पर्श हॉस्पीटलमध्ये गेल्या महिनाभरापासून पूर्णपणे कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजमितीलाही रुग्णालयात शंभरहून अधिक करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयांमधील सर्वांत कमी मृत्यूदर (केवळ 0.5) ठेवण्यात आम्हाला यश आले आहे. रुग्णालयामार्फत शासनाने व आयसीएमआरने ठरवून दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करून रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ANNEXUREC’ चे देखील तंतोतंत पालन केले जात असून काही हितशत्रुंमुळे हा प्रकार करण्यात आला आहे.

वस्तुत: रुग्णालयाचे सर्व कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता दिवसरात्र रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी लढा देत आहेत. आमच्याकडील उपचार उत्कृष्ट दर्जाचे आणि शासकीय नियमानुसार दर आकारणी करून केले जात असल्याने कोकणापासून मराठवाड्यापर्यंतचे करोनाबाधित रुग्ण आमच्या हॉस्पीटलला प्राधान्य देत आहेत. आमच्याबाबत केवळ एका रुग्णाने वीस हजार रुपयांच्या बिलावरून तहसीलदारांकडे तक्रार केली होती. आमच्याकडे अनेकांनी उपचार घेतले आहेत त्यांचेही म्हणणे ऐकूण घेणे गरजेचे होते. शेकडो रुग्णांवर उपचार सुरू असताना एखाद्याच्या हेकेखोरीमुळे असा प्रकार घडणे हे दुर्देवी आहे. रुग्णालयाला जाणिवपूर्वक बदनाम करणार्‍यांवर आम्ही कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button