मावळात राष्ट्रवादीचा दारूण पराभव; शिवसेनेला गड राखण्यात यश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/1552279262-Parth-Barne-696x376.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार पार्थ पवार यांचा दारूण पराभव झाला आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पावनेदोन लाख मतांनी पार्थ यांचा पराभव केला आहे.
राज्यातील लोकसभा मतदार संघापैकी मावळ लोकसभा मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार निवडणुकीच्या मैदानात होते. त्यांनी युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात निवडणूक लढविली. मतमोजणीला सुरुवात झाल्याच्या काही फेरीनंतर पार्थ पवार पिछाडीवर राहिले होते. तर, बारणे यांना हजारो मतांचे लीड मिळाले होते.
बारणे यांना 7 लाख 6 हजार 494 मते मिळाली तर पार्थ यांना 4 लाख 92 हजार 173 मते पडली आहेत. बारणे यांना 2 लाख 14 हजारांचे मताधिक्य आहे. एकूण 12 लाख 57 हजार 224 मतांची मोजणी झाली आहे. बारणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा गड शाबूत राखण्यात यश मिळविले आहे.