breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मावळात ‘छोटा राजन’च्या नावाने ‘तो’ उकळत होता खंडणी

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

मावळ परिसरात कुख्यात गुंड छोटा राजन आणि बाबा बोडके यांचे नावाने धमकावुन खंडणी मागणाऱ्याला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली.

विकी पोपट गायकवाड (रा.जांभुळ ता. मावळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस निरीक्षक पदमाकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकिल गुलाबअल्ली सोमजी (रा.बोटक्लब रोड, पुणे) हे चालवत असलेल्या वृध्दाश्रमात सेक्युरिटीचे काम द्यावे. ते दिले नाही तर त्यापोटी दरमहा २५ हजार रूपये खंडणी द्यावी. अशी मागणी केली. यानंतर सोमजी यांनी याकडे दुर्लक्ष केले. गायकवाड याने ९ जुनला मोबाईलवरून दहा व्हाट्स अँप मेसेज पाठून छोटा राजन त्यांचा मुलगा संकल्प तसेच बाबा बोडके यांच्या नावाने धमकावून अपहरण करण्याची धमकी दिली. त्यानंतर सोमजी यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणी पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांच्या सूचनेवरून पोलिस निरीक्षक पदमाकर घनवट, सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे,रामेश्वर धोंडगे , विजय पाटील, दतात्रय जगताप, प्रकाश वाघमारे, गणेश महाडिक यांनी सापळा रचून पकडले आणि कामशेत पोलिसांच्या ताब्यात दिले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button