breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मालमत्ता कर सवलतीपासून नागरिक वंचित राहण्याची शक्यता; मुदतवाढ देण्याची योगेश बहल यांची मागणी

पिंपरी – नागरिकांना 30 जूनपूर्वी मालमत्ता कर भरणा करण्यासाठी दहा टक्के सवलत दिली आहे. मात्र, त्याचा मिळकत धारकांना फायदा होत नाही. मिळकत धारकांना बिले वाटप करण्यातही प्रशासनाने दिरंगाई केली आहे. त्यामध्ये असंख्य चुका आहे. काहींना बिले मिळाली आहेत, तर काहींना अद्याप मिळालेली नाहीत. प्रशासनाच्या या चुकीमुळे नागरिक सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी योजनेला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक योगेश बहल यांनी सर्वसाधारण सभेत केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने चालू आर्थिक वर्षात मिळकतधारकांना विविध सवलती दिल्या आहेत. थकबाकीसह दोन्ही सहामाहीच्या बिलांची रक्कम 30 जूनपर्यंत एकरकमी भरल्यास मिळकतधारकांना सामान्य करात 10 टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. ही सवलत योजना 20 एप्रिलपासून सुरु करण्यात आली. परंतु, प्रशासनाने यामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप बहल यांनी केला आहे.

मालमत्ताधारकांना बिले देण्यास प्रशासनाने अतिशय विलंब केला आहे. त्यामध्ये देखील अत्यंत चुका आहेत. तसेच, अनेकांना बिले देखील मिळाली नाहीत. मग नागरिक सवलतीचा लाभ कसे घेणार आहेत?, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सवलत योजनेपासून कोणी वंचित राहू नये. त्यांच्या दिरंगाईचा फटका सर्वसामान्यांना बसता कामा नये, यासाठी सवलत योजनेला मुदतवाढ देण्यात यावी. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात शास्तीकर वगळून सामान्य कर स्वीकाराला जात होता. ही मुभा आत्ता भाजपच्या राजवटीत बंद करण्यात आली आहे. यामुळे सामान्य नागरिक वैतागले आहेत, असा आरोप बहल यांनी केला.

भाजपचेच नगरसेवक नागरिकांना सांगतात की शास्ती भरू नका आणि सामान्य करही भरु नका. सरकार निर्णय घेणार आहे, असे खोटे सांगण्यापेक्षा पदाधिका-यांनी पालकमंत्र्यांना भेटून शास्ती वगळून सामान्य कर स्वीकारण्याची मुभा मिळवून द्यावी. त्यामुळे नागरिक सामान्यकराचा भरणा करतील. तसेच, पालिकेच्या तिजोरीत देखील पैसे जमा होतील, असेही बहल म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button