breaking-newsपिंपरी / चिंचवड

मानव कांबळे यांच्या एकसष्टीनिमित्त नागरी सत्काराचे आयोजन

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त जाहीर नागरी सत्काराचे आयोजन केले आहे, अशी माहिती मारुती भापकर यांनी दिली. पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात 12 मार्च 2020 रोजी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

भापकर म्हणाले की, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संघटनाच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधाताई पाटकर यांच्या हस्ते व कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे.

या कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत गजानन खातू, स्वराज अभियान महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संजीव साने, सर्वहारा जनआंदोलनाच्या उल्का महाजन, एस एम जोशी फाऊंडेशनचे विश्वस्त सुभाष वादी, कामगार नेते अजित अभ्यंकर, जन आंदोलनाच्या नेत्या सुरेखा दळवी, कामगार नेते दिलीप पवार, किशोर ढोकले, डॉक्टर कैलास कदम, यशवंत भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थितीमध्ये महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, खा.डॉ. अमोल कोल्हे ,अमर साबळे आमदार लक्ष्मण जगताप महेश लांडगे अण्णा बनसोडे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी मानव कांबळे यांच्या संघर्षशील जीवनावरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन संपन्न होणार आहे. तरी शहरातील सर्व कामगार कष्टकरी नागरिक सामाजिक संघटना व संस्था यांच्यावतीने त्यांच्या सामाजिक कार्याचा बहुमान म्हणून त्यांना समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती भापकर यांनी दिली

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button