breaking-newsपिंपरी / चिंचवड

माजी आमदार विलास लांडे यांना विधान परिषदेवर संधी द्या; कार्यकर्त्यांची मागणी

पिंपरी ।महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विलास विठोबा लांडे यांना विधानपरिषदेवर घ्यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. बहुजन सम्राट सेना अध्यक्ष संतोष निसर्गंध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुप अध्यक्ष सतीश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. 

शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विलास लांडे हे राजकीय वस्ताद आहेत. त्यांनी दहा वर्षे आमदार म्हणून विकासाचेच राजकारण केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला तोडीस तोड टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीचे पक्षसंघटन मजबूत करणारा, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन कार्यकर्त्यांना ताकद देणारा आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारा नेता म्हणजे माजी आमदार विलास लांडे आहेत. त्यांच्यात ही क्षमता असल्यामुळे त्यांच्या रूपाने पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठा बदल होईल. राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसने कमबॅक केल्याचा राजकीय फायदा भोसरी विधानसभासह पिंपरी चिंचवड शहरास होईल. राष्ट्रवादीत विलास लांडे यांच्यासारखा दुसरा दिग्गज नेता नाही आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे दुसरे नेतृत्व नाही हे वास्तव आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून लांडे यांचे राजकीय पुनर्वसन करणे गरजेचे आहे. राज्यातील सत्ताचक्र फिरले आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना केली आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात झालेली ही उलथापालथ पिंपरी चिंचवडच्या राजकारणावर परिणाम करणारी ठरू शकते. त्याबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यानुसार राज्यात बदललेल्या सत्तासमीकरणाचा पिंपरी चिंचवड शहराला राजकीय फायदा होईल. शहर राष्ट्रवादीत लांडे यांच्यासारखा एकही दुसरा मुरब्बी नेता नाही. समाजातील सर्व घटकांना सोबत घेण्याची किंबहुना विरोधकांना देखील आपलेसे करण्याची त्यांच्यात राजकीय क्षमता आहे. त्यामुळे लांडे यांचे राजकीय पुनर्वसन झाल्यास त्याचा राष्ट्रवादीला राजकीय फायदा होणार आहे, असे त्यांनी वरिष्ठ नेत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये लांडे वगळता राष्ट्रवादीला सावरू शकेल व पक्षाला पुन्हा ऊर्जितावस्थेला आणू शकेल, असा कोणाताही नेता आढळून येणार नाही. लांडे यांच्यामध्ये असणारी राजकीय प्रगल्भता, जमेच्या बाजू आणि शहरातील राजकीय सद्यःस्थिती पाहता पक्षाकडून त्यांचे राजकीय पुनर्वसन करून, त्यांना विधानपरिषदेवर संधी मिळावी, अशी विनंती निसर्गंध आणि कदम यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button