breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मांडूळ तस्करी करणा-या चौघांना पोलिसांनी केले जेरबंद

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मांडूळ तस्करी करणा-या चारजणांना पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी (दि. 17) सायंकाळी सहाच्या सुमनारास भक्ती-शक्ती चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

सैफ रौफ शेख (वय 23, रा. जुना मुंढवा रोड, गणेश नगर, वडगाव शेरी), प्रमोद सुनील पाटील (वय 21, रा. खराडी, पुणे), दिनेश विजय नायर (वय 27, रा. टिंगरेनगर, अक्षय अपार्टमेंट, येरवडा), अमर रामदास उदमले (वय 31, रा. शेंदाणे चाळ, दापोडी) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीतील भक्ती-शक्ती चौकात चौघेजण मांडूळ घेऊन येणार असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली होती. चौकात सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता एका बॅगमध्ये चॉकलेटी रंगाचे एक मांडूळ आढळून आले. 50 इंच लांब, 9 इंच गोलाई आणि तीन किलो वजनाचे हे मांडूळ आहे. पोलिसांनी आरोपीकडून 15 लाख रुपये किमतीचे मांडूळ प्रजातीचे साप जप्त केले आहे. आरोपींवर वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. एल. सोनवणे करीत आहेत.

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस निकाळजे (गुन्हे) राजेंद्र निकाळजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. एल. सोनवणे, पोलीस कर्मचारी किशोर पढेर, मछिंद्र घनवट, संदीप पाटील, विलास केकाण, सतीश ढोले, विजय बोडके, राहुल मिसाळ, सोमनाथ दिवटे, स्वामीनाथ जाधव, रमेश मावसकर, गणेश शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button