महिलेच्या मेंदूमध्ये ट्युमरची गाठ; किचकट शस्त्रक्रिया ‘वायसीएम’मध्ये यशस्वी करुन रुग्णाला जीवदान
![Head of Medical Department of YCM, the authority to purchase medicine up to Rs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/ycm-photo.jpg)
- महिला रुग्णांला भूल न देता डाॅक्टरांनी बोलत केली शस्त्रक्रिया
- रुग्णांचा आठ ते दहा लाखांचा वाचविला खर्च, शहरातील पहिलीच घटना
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण रुग्णालय हे गोरगरीब रुग्णांसाठी नवसंजिवनी ठरु लागले आहे. शहरातील एका महिला रुग्णांच्या मेंदूमधील ट्युमरच्या गाठीमुळे त्रस्त होती. त्या महिलेला भूल न देता, शस्त्रक्रियेदरम्यान तिच्याशी बोलत वायसीएमच्या डाॅक्टरांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करत त्या महिलेला जीवदान दिले आहे, अशी माहिती न्युरो सर्जन डाॅ. अमित वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महापाैर राहूल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी सभापती विलास मडेगिरी, आयुक्त श्रावण हर्डिकर, अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र वाबळे, डाॅ. प्रवीण सोनी उपस्थित होते.
ही शस्त्रक्रिया न्युरो सर्जन डाॅ. अमित वाघ, डाॅ. प्रवीण सोनी, डाॅ. राजेंद्र वाबळे, डाॅ. हर्षद चिपडे, डाॅ. मारुती गायकवाड यांच्यासह सहकारी कर्मचा-यांनी यशस्वीरित्या पुर्ण केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात अत्यंत दुर्मिळ आणि ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे.
महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालय सतत विविध कारणांस्तव वादाच्या भोव-यात सापडलेले असते. त्यामुळे वायसीएम रुग्णालयात चांगल्या गोष्टी घडूनही अनेकदा नकारात्मक बाजू लोकांपर्यत जात आहे. त्यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिक वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयाकडे पाठ फिरवू लागले होते. परंतू, वायसीएम रुग्णालयात अत्यंत खर्चिक शस्त्रक्रिया अत्यल्प अथवा मोफत करुन गोरगरीब रुग्णांना नवसंजिवनी दिली जावू लागले आहे.
एका तीस वर्षाच्या महिलेच्या मेंदू ट्युमरची गाठ असल्याचे तिच्या एमआरआय तपासणीवरुन निर्दशनास आले. त्या महिला रुग्णांची आर्थिक परस्थिती नसल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य नव्हते. त्यामुळे सदरील महिलेला नातेवाईकांनी वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या महिलेला संपुर्ण भूल न देता, तिच्या मेंदूच्या शस्त्रक्रियेच्या तेवढ्याच भागाला भूल डाॅक्टरांनी दिली. रुग्ण पुर्णपणे शुध्दीवर असताना तिच्याशी बोलत महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली.
डाॅ. अमित वाघ म्हणाले की, ही शस्त्रक्रिया तीन तास चालली, त्या महिला रुग्णांच्या त्वचा, कवडी आणि स्नायू डाॅक्टरांनी कटींग केले. मेंदुच्या अन्य भागाला कोणताही धक्का न लावता मेंदूचा ट्युमर पुर्णपणे काढण्यात आला. त्या शस्त्रक्रियेस बाहेरील खासगी रुग्णालया आठ ते दहा लाख रुपये खर्च अपेक्षित होता. परंतू, त्या महिलेची ही शस्त्रक्रिया वायसीएम रुग्णालयात मोफत करण्यात आलेली आहे. सध्यस्थितीत रुग्णांची स्थिती अत्यंत चांगली आहे. पेशंट पुर्णपणे शुध्दीवर असताना त्याचे हात, पाय हलवित आणि बोलत शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यामुळे रुग्णांची हालचाली धोका पोहोचला नाही.
डाॅ. प्रवीण सोनी म्हणाले की, ही किचकट आणि अवघड शस्त्रक्रिया आहे. वायसीएम रुग्णालयात तंत्रज्ञान व सोयी-सुविधामुळे गोरगरीब रुग्णांवर सर्वात मोठ्या शस्त्रक्रिया होवू लागल्याने अनेकांना जीवदान मिळत आहे. रुग्णाच्या हाताला मुंग्या येणे आणि डोकं दुखणे ही लक्षणे असल्याने डाॅक्टरशी संर्पक साधून वेळीच उपचार करुन घ्यावेत.
डाॅ. राजेंद्र वाबळे म्हणाले की, वायसीएम रुग्णालयात ओपीडी आणि अत्यावश्यक विभागात रुग्णांशी संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्णांना योग्य निदान केल्याने गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळत आहे. वायसीएम रुग्णालयातील सकारात्मक घटना देखील लोकांपर्यत गेल्यास निश्चित वायसीएम रुग्णालय शहरातील सर्वसामान्य नागरिकांना चांगले उपचार मिळण्यास मदत होईल.
एकनाथ पवार म्हणाले की, महानगरपालिकेचे वायसीएम रुग्णालयात गोरगरीबांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यात आलेल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यानंतर वायसीएममध्ये तज्ञ डाॅक्टरांची फाैज असणार आहे. महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजनेतून अनेकांना लाभ मिळणार आहे. शहरासह अन्य जिल्ह्यातील रुग्णांना देखील चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्याने वायसीएम रुग्णांचा सर्वांना निश्चित फायदा होणार आहे.