महिलांच्या अंगावर रंगाचे फुगे फोडणा-या तरुणांची धुळवड पोलिस ठाण्यात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/whatsapp-image-2019-03-18-at-3.53.37-pm_201903208790.jpeg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – महिला आणि तरुणींच्या अंगावर रंगाचे फुगे फोडणा-या हुल्लडबाजांना पोलिसांनी हिसका दाखविला आहे. तब्बल 84 तरुणांना वाकड पोलिसांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुळवड साजरी करीत असताना चौकामध्ये ये-जा करणाऱ्या महिलांच्या अंगावर रंगाचे फुगे फोडण्याचा उद्योग काही तरुण करीत होते. दुचाक्या दमटत ही मुलं हुडल्लडबाजी करताना आढलून आली.
गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी अशा ८४ तरुणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. अशी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी वाकड पोलिसांनी ९ पथकं तयारी केली होती. यामध्ये ७ अधिकारी आणि ७५ कर्मचारी सहभागी होते. आज संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या तरुणांना आज दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात येणार आहे. त्यांच्याकडील चारचाकी आणि दुचाकी वाहनं देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.