breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महासभेत महापाैरांचा अजब कारभार; वाचा.. मंजूर, वाचा.. मंजूर! तीन मिनिटात सभा समाप्त

महासभेत उपसूचना न वाचताच महापाैरांनी केल्या मंजूर; सभाशास्त्राचे नियम तुडविले पायदळी

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापाैर उषा ढोरे यांनी सभागृह चालवताना सभाशास्त्रांचे नियम पायदळी तुडविले आहेत. त्यांनी करयोग्य मुल्य विषयांवर विरोधकांना दमदाटीची भाषा बोलून दाखवत अवघ्या तीन महिन्यात तब्बल 18 विषय मंजूर केले. सभागृहात नगरसदस्यांनी विषय वाचून दाखविले. पण उपसुचना वाचल्याच गेल्या नाहीत. तरीही महापाैरानी उपसुचनेसह विषय मंजुर केले. त्यामुळे सभाशास्त्रांचे नियम पायदळी तुडविले आहेत. दरम्यान, उपसूचनेबाबत नगरसचिव अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

पिंपरी चिंचवड महापालिकेची 20 फेब्रुवारीची तहकूब महासभा आज (बुधवारी) सभागृहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर उषा ढोरे होत्या. सत्ताधारी भाजपकडून महापालिका हद्दीतील जून्या इमारतींना ‘कर योग्य मूल्य’ लागू करण्यात आला. त्यावर शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांना महापाैरांनी बोलण्यास मज्जाव केला. त्यावरुन सभागृहात एकच गोंधळ उडाला.

शहरातील जून्या इमारतींना 1 एप्रिल 2020 पासून कर योग्य मूल्य लागू करण्यात येत आहे. हा विषय सत्ताधारी भाजपकडून मंजूर करण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेसह भाजप काही नगरसेवकांनी करवाढ लागू करण्यास विरोध दर्शविला. मात्र, भाजपकडून हा प्रस्ताव फेटाळला अथवा दप्तरी दाखल केला असता, तरीही आयुक्तांच्या अधिकारात त्यांनी 1 एप्रिलला करवाढ लागू करणार असल्याचे ठणकावून सांगितले आहे.

या प्रस्तावावर बोलण्यास शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी महापाैरांकडे मागणी केली. पण त्यांना बोलण्यास न देताच महापाैरांनी दुस-या विषयास सुरुवात केली. त्यावेळी कलाटे यांनी महापाैर.. तुम्ही दादागिरी करत आहात. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच हातातील ग्लास जमिनवर आदळत महापाैरांचा निषेध व्यक्त केला.

दरम्यान, महापाैरांनी सभागृहातील गोंधळातच त्यांनी तीन मिनिटात तब्बल 18 विषय मंजूर केले. त्यांनी नगरसदस्यांना वाचा… मंजूर, वाचा… मंजूर असा जणू सपाटाच लावला. हे विषय वाचताना नगरसदस्यांनी विषय वाचले, त्याला अनुमोदन पण दिले. मात्र, त्या गोंधळात उपसूचना न वाचताच मंजूर करण्यात आल्या आहेत.

उपसूचनाबाबत नगरसचिव अनभिज्ञ…

त्यावर महापाैरांनी बोलण्यास नकार दिला. याशिवाय पालिकेचे नगरसचिव यांनी देखील उपसूचना अजून माझ्या ताब्यात आल्या नाहीत. असं सांगून अनभिज्ञ असल्याचे दाखवून दिले. महापाैरांनी उपसूचनासह विषय मंजूर केल्याचे सांगताना कोणत्या उपसूचना घ्यायच्या आणि कोणत्या नाहीत, याबाबत महापाैरच ठरवितात, असंही सांगितले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज सभाशास्त्रानुसार नव्हे तर प्रथा – परंपरेवर चालत असल्याचे दिसून येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button