breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने तळेगांव दाभाडे येथील महिलेची जटेतून मुक्तता

तळेगांव दाभाडे | महाईन्यूज | प्रतिनिधी

ता. मावळ येथील सुनिता गोपाळे (वय 40 वर्षे) या महिलेच्या डोक्यात 12 वर्षाच्या असताना डोक्यात जट आली म्हणुन शाळा सोडावी लागली.त्यानंतर त्याचे लग्न झाले. डोक्यात छोटी असलेली जट वाढत चालली होती. पदरात दोन मुलं त्यातील एका मुलाचा मृत्यु झाला. सुनिताताईचा सासरच्या लोकांचे मत होते की ही आपल्या घरासाठी चांगली नाही. ही वेडी आहे असे म्हणुन तिला घरातुन हाकलुन दिले. तेव्हा पुढे काय करायचा हा प्रश्न पडला.

धुणी भांड्याचे काम मागायला गेले की,डोक्यातील जट पाहुन त्यांना कोणी काम देत नव्हते.तेव्हापासुन सुनिताताई स्वतःचा उदरनिर्वाह बिगारी काम करून स्वतःचे पोट भरू लागल्या.जट वाढतच चालली होती.जटकाढायची तर 60,000 हजार रूपये खर्च येणार होता तो खर्च करण्याची परिस्थिती नव्हती.त्यामुळे गेली 28 वर्षे त्या जटेचे ओझे वाहत होत्या.
गेल्या वर्षी तळेगांव ढमढेरे गावातील एका महिलेचे जट निर्मूलन केलेल्या सुमनताईनी सुनिताच्या डोक्यातील जट पाहीली.तुला जट काढायची असेल तर नंदिनी ताईना फोन कर.त्या तुझ्या डोक्यातील जट काढुन देतील.असे सांगुन माझा मो.नं.दिला.आठ दिवसापूर्वी सुनिताताईना मला फोन केला.
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सर्व ठिकाणी लाॅकडाऊन असल्यामुळे मला तळेगांव दाभाडे येथे जाणे शक्य नव्हते.31मे नंतर येईन असे आश्वासन दिले.
लाॅकडाऊनला शिथिलता आल्यामुळे आज सुनिताताईची जट काढण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला.तसा निरोप देहुरोडला राहणारे मिलिंद देशमुख( महा.अंनिस,राज्य प्रधान,सचिव) सरांना दिला.त्यांनीही बरोबर येण्याची तयारी दर्शवली.
रस्त्यावर वाहनाची गर्दी कमी असल्यामुळे 40 मिनिटात देहुरोडला पोहचले.तिथुन मिलिंद देशमुख सरांसोबत तळेगांव दाभाडेला 15 मिनिटात पोहचलो.
सुनिताताई तिथे बिगारी काम करत होत्या तिथे पोहचलो असता.जट कुठे काढायचा हा प्रश्न होता.जिथे काम चालले होते तिथे जट काढण्यास नकार दिला.तेव्हा जवळच असणार्‍या मंदिरात जट काढण्याचे ठरले.तेथील मंदिराची पाहणी करणार्‍या सावंत ताईची परवानगी घेवुन त्या मंदिराच्या परिसरात सुनिताताईच्या डोक्यातील जट काढण्यात आली.
28वर्षे जटेचे ओझे वाहणार्‍या सुनिता ताईची जट काढण्यास फक्त एक मिनिट लागला पण 28 वर्षात या जटेमुळे त्यांना किती त्रासाला समोर जावे लागले असावे, याचा विचार मन खिन्न करणारा आहे.
जट निर्मूलन करताना महा.अंनिस,राज्यप्रधान सचिव, मिलिंद देशमुख,सावंतताई,दादासाहेब लाड(अंनिसचे युवा कार्यकर्ते) या सर्वाच्या उपस्थितीत सोशल डिस्टंन्सचे पालन करत जट निर्मूलन करण्यात आले अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती
पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button