महाराष्ट्राच्या शांततेस बाधा निर्माण करणाऱ्या ‘त्या’ सर्व आरोपींना अटक करा: संभाजी ब्रिगेड
पिंपरी | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या शांततेस बाधा निर्माण करणाऱ्या त्या सर्व आरोपींना अटक करून त्यांचेवर जातीय दंगलींचे गुन्हे दाखल करण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष सतिश काळे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,काही दिवसांपूर्वी पिंपळे सौदागर येथे दोन कुटुंबातील वादातून विराज जगताप या 20 वर्षीय तरुणाचा खून झाला होता. खुन होणे हे दुर्दैवी आणि निषेधार्ह आहेचं व सदर प्रकरणी आरोपींना अटक झाली असून योग्य ती कायदेशीर प्रक्रिया चालू असताना काही समाजकंटकांनी या घटनेचा आधार घेऊन मराठा-दलित समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केलेला दिसत आहे. तसेच या प्रकरणाला जातिय रंग देऊन काही अत्यंत विकृत असे व्हिडिओ बनवून व्हाट्सअप , फेसबुक , टिकटॉक या सारख्या सोशल मीडिया वरुन प्रसारीत करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अशांतता निर्माण झाली होती अशा समाजकंटकांवर आपण विनयभंग तसेच साईबर क्राईम अंतर्गत गुन्हे देखील दाखल केलेले आहेत त्याबद्दल आपले अभिनंदनच आहे.
परंतु तरी अश्या समाजविघातक लोकांवर कायमस्वरूपी जरब बसविण्यासाठी या गुन्ह्यां व्यतिरिक्त *जातीय तेढ निर्माण करणे ,दंगलसदृश परिस्थिती तयार करणे, राज्यात अशांतता निर्माण करणे* याचे अंतर्गत IPC कलम 153 153A 295 अ 298 505 r/w 34 and sec 66 & 67 Information Technology Act, 2000 या कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत . निवेदनावर विशाल तुळवे, संभाजी ब्रिगेड जिल्हाअध्यक्ष सतिश काळे, जिल्हा उपाध्यक्ष
गणेश दहिभाते, जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.