Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
महायुतीच्या प्रचाराचा नारळ पिंपरीत फुटणार, ‘उध्दव ठाकरे’ची शुक्रवारी जाहीर सभा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/download-5.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
शिवसेना-भाजप महायुतीच्या पिंपरी, चिंचवड आणि भोसरी उमेदवारांच्या प्रचारासाठी संयुक्त प्रचारसभा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी (दि. ११) पिंपरीत होणार आहे, अशी माहती जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी दिली.
पिंपरी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मैदानात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता या सभेचे आयोजन केले आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार, चिंचवडचे भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे भाजप उमेदवार महेश लांडगे यांचा प्रचाराचा नारळ फूटणार आहे.
या प्रचार सभेसाठी शिवसेना-भाजप रिपाइं, रासप, रयत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन चिंचवडे यांनी केले आहे.