breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापौर राहूल जाधव यांचे पीएमपीएमएल व्यवस्थापनाला आव्हान  

  • काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता बीआरटी मार्ग सुरू होणार
  • 20 बसेस खरेदी करण्याची दाखविली तयारी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता हा बीआरटी मार्ग गेल्या पाच वर्षांपासून रखडला आहे. सध्या तयार असलेला हा बीआरटी मार्ग लवकरच सुरू करण्यात येणार आहे. बसेसचा तुटवडा असेल तर बसेस आपण खरेदी करू, पण हा बीआरटी मार्ग सुरू करू, असा पवित्रा महापौर राहूल जाधव यांनी घेतला आहे. अधिका-यांच्या नाकर्तेपणामुळे रखडलेला हा बीआरटी मार्ग सुरू होण्याची उत्सुकता प्रवाशांना लागली आहे.

काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता या बीआरटी मार्गातील एमआयडीसीमधील काही भाग गेल्या पाच वर्षांपासून रखडलेला आहे. परंतु, उर्वरीत रस्त्यावर बीआरटी रूट तयार आहे. काही थोड्या अंतरावर बीआरटी नसल्यामुळे हा मार्ग चालू करणे शक्य नसल्याचे रडगाणे पालिकेतील अधिकारी गात होते. आता पीएमपीएमएलकडे पुरेशा बसेस उपलब्ध नसल्यामुळे हा मार्ग सुरू करता येत नसल्याची मखलाशी जोडत आहेत. त्यावर महापौर राहूल जाधव यांनी पीएमपीएमएल आणि बीआरटीचे काम पाहणा-या अधिका-यांना बोलाऊन चांगलेच झापले. त्यांना माहिती विचारण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहरास सार्वजनिक प्रवाशी सेवा पुरविण्यासाठी पीएमपीएमएलच्या ताफ्यात 1 हजार 398 स्वतःच्या बसेस आहेत. तर, 653 बसेस ठेकेदाराने उपलब्ध करून दिल्या आहेत. अशा एकूण 2 हजार 51 बसेस पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत राहणा-या नागरिकांच्या सेवेत असल्याची माहिती अधिका-यांनी दिली. मात्र, प्रत्यक्षात 2 हजार 51 बसेसपैकी 50 टक्के बसेस सुध्दा आजरोजी शहरात धावत नसल्याची वस्तुस्थिती आहे. केवळ 1 हजार 356 बसेस आजरोजी नागरिकांच्या सेवेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे लक्षात येताच महापौर राहूल जाधव यांनी डोक्याला हात लावले.

त्यावर संतापलेल्या अवस्थेत महापौर म्हणाले, पुढील दहा दिवसांत काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या बीआरटी मार्गावरील बस थांब्याचे काम पूर्ण करून घ्या. बसेस नसतील तर केवळ या मार्गावर धावण्यासाठी 20 बसेस आपण खरेदी करू. परंतु, हा रखडलेला बीआरटी मार्ग लवकर सुरू करू. दोन-चार दिवसांत त्याचे सादरीकरण घेतले जाईल, असेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button