महापालिकेत डॅशिंग अन् दमदार कामगिरीने अतिरिक्त आयुक्त अजित पवाराची जबाबदारी वाढली
म्हणून आयुक्त श्रावण हर्डिकरांनी दिली वादग्रस्त आणि गुंतागुतीच्या विभागाची जबाबदारी
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी अतिरिक्त आयुक्त एक आणि दोन यांच्यामध्ये विभागाच्या कामकाजात अदलाबदल केले आहे. डॅशिंग व दमदार कामगिरीने सर्वत्र चर्चेत असलेल्या अतिरिक्त आयुक्त (दोन) चे अजित पवार यांच्यावर वादग्रस्त आणि गुंतागुंती असलेल्या विभागाची जबाबदारी सोपविली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झालेला आहे. त्यामुळे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर दोन आणि महापालिकेचा एक अशी एकूण तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यात प्रतिनियुक्तीवर असलेले संतोष पाटील अतिरिक्त आयुक्त (एक) तर अजित पवार यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त (दोन) आणि महापालिकेत प्रवीण तुपे यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त (तीन) चा ‘अतिरिक्त पदभार’ देण्यात आला आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (एक) प्रत्येक प्रस्तावावर शेराकंन करुन चर्चा करीत होते. अनेकदा फाईल प्रलंबित ठेवून कामकाजात दिरंगाई करायचे, त्यावर महापालिकेच्या महासभेत ज्येष्ठ नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्त (एक) यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले होते. गावची पाटीलकी सोडून कामकाज बदल करा, असा सल्लाही दिला होता. तसेच उद्यान विभागात देखभालीच्या निविदा प्रक्रियेत नियमबाह्य कामे करुन प्रत्येकी कामे वाटून देण्यात आल्याची चर्चा आहे. कित्येक फाईल्सवर दहा-पंधरा दिवस सही होत नसल्याने आयुक्तांकडे तक्रारी वाढल्या होत्या.
तर अतिरिक्त आयुक्त (दोन) यांच्या कामाचा धडाका लावला आहे. त्याच्या टेबलवर कधीही फाईल्स पेडींग राहत नाहीत. प्रत्येक विषयात तत्काळ निर्णय घेतल्याने कारभार गतीमान झाला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिका-यासह कनिष्ठ कर्मचा-यांना त्यांच्या कामावर खूश आहेत. सध्यस्थितीत त्यांच्याकडे मध्यवर्ती भांडार विभाग, आरोग्य ही वादग्रस्त विभाग होते.
कोरोना सारख्या महामारीत अत्यंत जबाबदारीने काम केले. विविध कोविड सेंटर उभारणी, आवश्यक ती तातडीने खरेदी करणे, कामकाजात सुसूत्रतता आणून तातडीने निर्णय घेतल्याने शहरातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यात त्यांची मोलाची कामगिरी केली आहे. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे सध्यस्थिती वादग्रस्त ठरलेला पाणीपुरवठा व जल:निस्सारण विभाग, तसेच महापालिकेचा महसूल वाढवण्याच्या दृष्टीने बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, तर नद्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी पर्यावरण अभियांत्रिकी असे महत्त्वाचे विभाग नव्याने त्यांच्याकडे सोपवले आहेत.
दरम्यान, तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता, वादग्रस्त विषय हाताळण्याची सचोटी, प्रलंबित फाईल्स निकाली काढण्याचा सपाटा, यासह विविध कामकाजामुळे अतिरिक्त आयुक्त (दोन) यांच्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महत्वांचे विभाग सोपविले आहेत. त्यामुळे महापालिकेतील त्या विभागातील कामकाजात पारदर्शकता व गतीमान कारभार होण्यास मदत होणार आहे.
अतिरिक्त आयुक्त (दोन) यांच्याकडे सोपविले हे विभाग
पाणीपुरवठा व जल:निस्सारण विभाग, बांधकाम परवानगी, अतिक्रमण मुख्य कार्यालय (अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलन विभाग), पर्यावरण अभियांत्रिकी, मध्यवर्ती भांडार विभाग, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय, कर आकारणी व करसंकलन विभाग, आकाशचिन्ह व परवाना विभाग, स्थानिक संस्था कर, भूमी आणि जिंदगी, सर्व क्षेत्रीय कार्यालये, क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व विभाग (सार्वजनिक वाचनालय, प्रेक्षागृहासह), निवडणूक जनगणना (आधारसह), सभाशाखा असे महत्त्वाचे 14 विभाग त्यांच्याकडे दिले आहेत.