breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

महापालिकेतील 28 लिपिकांची पदोन्नती रद्द, खातेनिहाय चाैकशीचे दिले आदेश

  • टंकलेखन प्रमाणपत्र बोगस प्रकरण, 117 पैकी 28 कर्मचा-यावर कारवाई
  • चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे पदावतन करुन खातेनिहाय चाैकशीचे आदेश
  • अजूनही काही कर्मचा-यांवर कारवाईची टागती तलवार 

पिंपरी ( विकास शिंदे ) – पिंपरी चिंचवड महापालिका आस्थापनेवरील चर्तुर्थ श्रेणी वर्गातून लिपिक पदावर पदोन्नती मिळविलेल्या कर्मचा-यांनी टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर केले आहे, त्यामुळे 117 कर्मचा-यांपैकी 28 लिपिकांची पदोन्नती रद्द करण्यात आली. त्या कर्मचा-यांचे वर्ग ड चतुर्थश्रेणी पदावर पदावतन करुन खातेनिहाय चाैकशीचे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले. 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचा-यांची अपुरी संख्या, शासन दरबारी लालफितीत अडकलेल्या आकृतीबंधामुळे प्रशासनाला कर्मचा-यांची कमरतता जाणवत होती. त्यामुळे प्रशासनाने मंजूर पदावर चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनूसार लिपिक पदावर पदोन्नती दिली. महापालिका आस्थापनेवरील वर्ग 4 मधील सुमारे 117 कर्मचा-यांना वर्ग 3 मधील लिपिक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय प्रशासनाने काही दिवसापुर्वी घेतला. त्याचा लाभ सुमारे 117 कर्मचा-यांना झाला. त्याच्या शैक्षणिक अर्हतेनूसार पदोन्नती देण्यात आली. परंतू, त्यातील काही कर्मचा-यांनी पदोन्नती मिळविण्यासाठी टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याची बाब निर्दशनास आली. बोगस प्रमाणपत्र सादर त्या कर्मचा-यांनी ही पदोन्नती मिळविल्याची तक्रार आयुक्तांकडे प्राप्त झाली. त्यामुळे सर्वच कर्मचा-याचे प्रमाणपत्रे हे महाराष्ट्र राज्य परीक्षा तंत्रशिक्षण परिषदेकडून खातरजमा घेण्यासाठी पाठविली होती.

त्या कर्मचा-यांचा अहवाल महापालिका प्रशासनास प्राप्त झाला आहे. त्या कर्मचा-याचा अहवालात टंकलेखनाचे प्रमाणपत्र वैध की अवैध आहे याविषयी स्पष्ट माहिती तंत्रशिक्षण परीक्षा मंडळाने दिलेली नाही. टंकलेखन प्रमाणपत्राची योग्य माहिती न दिल्याने महापालिका प्रशासनाला त्या कर्मचा-यावर कारवाई अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन विभागाने पुन्हा राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना पत्र पाठविले आहे. चतुर्थ कर्मचा-यांना दिलेल्या पदोन्नतीत टंकलेखन प्रमाणपत्राची माहिती देण्यास परीक्षा मंडळा उडवाउडवीचे उत्तरे देत आहे. त्यामुळे परीक्षा मंडळाने स्पष्ट अभिप्राय देवून हे टंकलेखनाचे प्रमाणपत्र वैध की अवैध आहे याविषयी सविस्तर माहिती देण्याची विनंती पत्राद्वारे केलेली आहे.

त्यानंतर महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांचा तपासणी अहवाल प्राप्त झालेला असून 28 या कर्मचा-याचा टंकलेखन प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्या कर्मचा-यांना मुळ टंकलेखन प्रमाणपत्र सादर करण्यास वारंवार सांगूनही त्यांनी प्रशासनाकडे प्रमाणपत्रे सादर केलेली नाहीत. कर्मचा-यांनी महापालिकेची दिशाभूल व फसवणूक लिपिक पदावर पदोन्नती घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, महापालिकेच्या 28 कर्मचा-यांनी पदोन्नतीच्या वेळी टंकलेखनाच्या खोट्या छायांकित सत्यप्रती सादर करुन मनपाची दिशाभूल व गंभीर फसवणूक करुन पदोन्नती घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नियुक्ती आदेशातील अटी व शर्तीचा भंग केलेला आहे. त्या कर्मचा-यांना आदेशापासून लिपिक या पदावरील सेवा सपुष्टात आणणेत येत आहे. त्याचे पदोन्नती पुर्वीच्या गट ड च्या मुळ पदावर  वेतनश्रेणी पदावतन करण्यात येत आहे. तसेच त्यांची विविध विभागत पदस्थापना देवून खातेनिहाय चाैकशी सुरु करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

लिपिक पदोन्नती रद्द झालेल्या कर्मचा-याची नावे

नितीन सिताराम वाघ, किरण अर्जून भाट, विनेश विलास जाधव, सखाराम महादू घुले, ज्ञानेश्वर शंकर भरेकर, मारुती गोपाळ मेंगडे, गिरीष धर्मानंद जोशी, मोहिद्दीन महंमद शेख, सोमनाथ बारकू शेख, हनुमंत नामदेव बहिरट, भगवान राजाराम बारे, मिनाश्री अमित गुंड, संभाजी गंगाराम भंडारे, सुरेश बाळासाहेब गारगोटे, गणेश शंकर वाळुंज, सुदाम सत्यवान नाणेकर, परशुराम सिताराम कदम, संतोष गोविंद लांडगे, सारिका नथूराम मादगुडे, विनायक पंडीत रायते, निलेश शशिकांत टिळेकर, राहूल सुरेश ककरोटी,  महेश रामचंद्र कोळी,दिपक साईनाथ जाधव, प्रसाद वामन खरात, अमोल लक्ष्मण खांडेकर, अमरिका कैलास लांडे व शामलता सुनिल तारु या कर्म-याना लिपिक पदावरुन पदावतन करुन गट ड मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.  

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button