breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिकेतर्फे गरीब महिलांचे कल्याण; विद्यार्थी हितालाही प्राधान्य

महिला बालविकास समितीचा पुढाकार

पिंपरी – महिला व बालकल्याण समितीअंतर्गत वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत झोपडपट्टीतील महिला बचत गटांचे सदस्य असलेल्या महिलांना चादर, कंबल, दरी पंजा आणि बेडशीट देण्यात येणार आहेत. यासह इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांचा बौध्दीक विकास होण्यासाठी खेळणीही देण्यात येणार आहे. त्यामुळे मनपाच्या शाळेतील विद्यार्थी संख्येत वाढ होणार आहे.

 

महिला व बालकल्याण समितीअंतर्गत शहरातील विविध घटकातील महिलांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनेंतर्गत शहरातील महिला बचत गटांच्या सभासद महिलांना दोन चादर, दोन बॅरेक कंबल, दोन दरी पंजा, दोन बेडशीट देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, संबंधित महिलेचा झोपडपट्टी भागात रहिवास असावा, अशी अट आहे. महिला सभासदांनी आपले आधार कार्ड दाखविल्यास वरील साहित्य दिले जाणार आहे. या कामासाठी महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादीत, दि. पंतनगर गार्डन, व्ह्यु को-ऑप हौसिंग सोसायटी, लि. शशांक 225/5958 पंतनगर, घाटकोपर (पूर्व) मुंबई – 400 075 या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे.

 

बालवाडी आणि इयत्ता 1 ली ते 3 रीच्या विद्यार्थ्यांना शाळेत खेळण्यासाठी खेळणी खरेदी केली जाणार आहेत. खेळण्यांच्या माध्यमातून मुलांचा बौध्दीक विकास होणार आहे. यापूर्वी खेळण्यांचा प्रयोग केल्यामुळे मुलांच्या बौध्दीक विकासात वाढ होऊन पटसंख्येतही वाढ झाली आहे. भविष्यातही विद्यार्थी संख्या वाढत राहण्यासाठी पालिकेने या योजनेवर भर दिला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button