महापालिकेतर्फे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/DSC_8945-copy.jpg)
पिंपरी- साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या निगडी येथील पुतळ्यास तसेच महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार व विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात झालेल्या या कार्यक्रमात अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, मनसे गटनेता सचिन चिखले, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, नगरसदस्या सुमन पवळे, शर्मिला बाबर, नगरसदस्य उत्तम केंदळे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, रामकिसन लटपटे, अरुण जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.
मनपा मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे नगरसदस्या शर्मिला बाबर, नगर सचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, मनोज लोणकर, अण्णा बोदडे आदी मान्यवर उपस्थित होते.