breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या सहा नागरी सुविधा केंद्राला स्थायीची मान्यता

  • दोन महिन्यात १९ नागरी सुविधा केंद्र बंद

पिंपरी ( महा ई न्यूज )  –  महापालिकेच्या सोयी-सुविधा नागरिकांना तात्काळ मिळाव्यात, त्यांना लांबच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागू नयेत, याकरिता महापालिका कार्यक्षेत्रात नव्याने 6 नागरी सुविधा केंद्र सुरु करणार असून त्या अर्जदारांना नियुक्ती देण्यास स्थायी समितीने आज (बुधवारी) झालेल्या सभेत मान्यता देण्यात आली. 

महापालिकेच्या स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी हे होते. पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात एकूण ६९ नागरी सुविधा केंद्र आहेत. त्यापैकी दोन महिन्यांपासून १९ केंद्रे बंद आहेत. तर सध्या ५० केंद्र कार्यरत आहेत. त्यात आता नव्याने ६ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.

महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रचा तीन वर्ष कालावधीसाठी करार करून खासगी तत्वावर ६ नागरी सुविधा केंद्रचालक नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये  मंगेश ताम्हाणे (प्रभाग क्रमांक ३) सुवर्णा वाळके (प्रभाग क्रमांक ४) प्रेमा पाठासकर ( प्रभाग क्रमांक १०) सचिन इंगवले( प्रभाग क्रमांक १०) गौरव थोरात (प्रभाग क्रमांक १२) स्वप्निल शेडगे (प्रभाग क्रमांक १८ ) याचा समावेश आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button