महापालिकेच्या पदोन्नती समितीचे घेणार जबाब – सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश पाटील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/1-2-1.jpg)
पिंपरी – महापालिकेच्या वैद्यकीय आस्थापनेवर असलेले डाॅ. शंकर जाधव यांना वायसीएम रुग्णालयात उपवैद्यकीय अधिक्षक पदावर पदोन्नती देण्यात येणार होती. परंतू, त्यांना पदोन्नती मिळू नये, म्हणून काही डाॅक्टरांनी बनावट लेटरहेड वापर करुन त्यावर खोट्या व बिनबुडाचा मजकूर लिहून ते महापालिका तत्कालीन आयुक्त देण्यात आले होते. त्यामुळे त्यांना पदोन्नती देण्यास टाळाटाळ करण्यात आली होती. दरम्यान, याबाबत बदनीकारक मजूर समाजात पसरविल्याप्रकरणी डाॅ. अनिल राॅय व डाॅ. हेमंत चिखलीकर यांच्यावर फसवणूकीचा गुन्हे दाखल करण्यात आला आहे. त्या दोन डाॅक्टरांचे पोलिसांनी जबाब नोंदविले आहेत. परंतू, महापालिका पदोन्नती समितीतील पाच वरिष्ठ अधिका-यांचे देखील जबाब नोंदविले जाणार असून त्यांना लवकरच पिंपरी-चिंचवड पोलिस परिमंडल – 3 कार्यालयात बोलविण्यात येणार आहे, अशी सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश पाटील यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या डॉ. शंकर जाधव यांना “वायसीएम’ रुग्णालयाच्या उपवैद्यकीय अधीक्षकपदावर पदोन्नती देण्यात येणार होती. परंतु, महापालिकेतील डॉ. हेमंत चिखलीकर यांनी जाधव यांना पदोन्नती मिळू नये. याकरिता बनावट “लेटरहेड’चा वापर करुन त्यावर खोट्या व बिनबुडाचा मजकूर लिहून ते पत्र 19 डिसेंबर 2015 महापालिका आयुक्तांना देण्यात आले. तसेच, सदरील बनावटी “लेटरहेड’ आणि त्यातील मजकूर हा पुढे महापालिका वैद्यकीय विभागाच्या “ई-मेल’ पत्यावरुन सर्व हॉस्पीटलमध्ये पसरवला. त्यामुळे डॉक्टर हेमंत चिखलीकर यांनी माझी बदनामी करुन मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याची तक्रार डॉ. जाधव यांनी तत्कालीन आयुक्तांकडे दिली होती. तसेच, बोगस संस्थेचे बनावट “लेटरहेड’ बनवून त्याद्वारे बदनामीकारक मजकूर समाजात पसरवला होता. याबाबत डॉ. जाधव यांनी चिंचवड पोलीस स्टेशनला सदरील तक्रार दाखल केली होती. तसेच, राष्ट्रीय जाती आयोग दिल्ली यांच्याकडेही तक्रार दाखल केली होती. मात्र, त्या ठिकाणी न्याय मिळत नसल्याने याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात आली.
पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशात डॉ. हेमंत चिखलीकर व डाॅ. अनिल राॅय यांच्यावर विविध कलमार्तंगत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडे पिंपरी परिमंडळ तीन मधील सहाय्यक पोलीस आयुक्त 156 अंतर्गत चौकशी करुन 90 दिवसांत अहवाल सादर करणार आहेत. याबाबत सहायक पोलिस आयुक्त सतीश पाटील यांनी डाॅ. हेमंत चिखलीकर, डाॅ. अनिल राॅय यांचे जबाब घेतलेले आहे. परंतू, महापालिकेची पदोन्नती देणा-या समितीतील सदस्यांचे जबाब नोंदविले जाणार आहेत. यामध्ये आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त, लेखापरिक्षक, लेखाधिकारी या समितीतील अधिका-यांचे जबाब घेवून तो अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे, अशीही माहिती पाटील यांनी यावेळी दिली.