breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या क्रीडा शिष्यवृत्तीस 144 खेळाडू पात्र – सभापती तुषार हिंगे

  •  खेळांडूना क्रीडा शिष्यवृत्ती देण्यास क्रीडा समितीची मान्यता

पिंपरी (महा ई न्यूज ) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाकडून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खेळांडूना प्रोत्साहन मिळावे, म्हणून दरवर्षी क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येते. सन 2017-18 या आर्थिक वर्षात 144 खेळांडूना क्रीडा शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहे. त्याना सहा लाख 22 हजार 600 रुपये शिष्यवृत्ती अदा करण्यात येणार असून आज (शुक्रवार) झालेल्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या बैठकीत मान्यता दिल्याचे सभापती तुषार हिंगे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थी खेळांडूसाठी शालेय क्रीडा शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. यामध्ये राज्यस्तर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणा-या खेळांडूचा समावेश आहे. महापालिकेच्या क्रीडा विभागाने सन 2017-18 या आर्थिक वर्षात शिष्यवृत्तीस अर्ज मागविले होते. त्यावेळी 156 अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील 12 अर्ज अपात्र ठरले असून 144 अर्ज पात्र ठरले आहेत. यामध्ये राज्यस्तर 68, आंतरविद्यापीठ 9, राष्ट्रीयस्तर 67 असे एकूण 144 खेळांडूना क्रीडा शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच क्रीडा विभागाने राज्यस्तर व आंतरविद्यापीठ खेळांडूना 3 हजार 300 रुपये, तर राष्ट्रीय खेळांडूना 5 हजार 500 रुपये अशी एकूण 6 लाख 22 हजार 600 रुपये अदा करण्यात येणार आहेत. असे हिंगे यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button