breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेचे शेकडो गाळे धूळखात पडून, लाखो रुपयाचा महसूल बुडाला

पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरामध्ये ठिकठिकाणी गाळे बांधण्यात आले आहेत. हे गाळे भाडेतत्वार देऊन महापालिकेला महसूल मिळण्याची अपेक्षा होती. कोट्यवधी रुपये खर्च करून गाळे बांधले आहेत. मात्र 209 गाळ्यांना ग्राहक मिळत नसल्याने ते रिक्‍तच आहेत. परिणामी महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.

महापालिकेने गाळे बांधणीनंतर गाळ्यांचे वाटप सुरु केले. मात्र यामध्ये अधिकारी व नगरसेवकांच्या संगणमताने वाटप झाले. त्यामुळे मोक्‍याच्या जागा नाममात्र भाडे आकारून दिल्या. त्यानंतर 2008-09 मध्ये ऑनलाइन पद्धतीने निविदा मागविण्यास सुरवात करण्यात आली. पूर्वी नाममात्र भाड्याने दिलेल्या जागा आताच्या दराप्रमाणे दिल्या तर महापालिकेच्या महसुलात कोट्यवधींची वाढ होऊ शकते.

जे गाळे शिल्लक आहेत ते भाड्याने घेण्यासाठी ग्राहक मिळत नसल्याने ते अडगळीत पडले आहेत. एका गाळ्यासाठी सुमारे 9 हजार रुपये भाडे आकारण्याचा निर्णय महापालिकेने काही दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र ही रक्कम जास्त असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला नाही. शहरातील सर्वाधिक 96 गाळे हे पिंपरी भाजी मंडईमधील रिक्त आहेत. त्यापाठोपाठ पिंपरी ओव्हरब्रीज खालील 30 गाळे रिक्त आहेत. या गाळ्यांच्या स्वच्छेता प्रश्‍न नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. तसेच येथे सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसल्याने येथील गाळे भाडेत्तत्वावर घेण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.

महसूलाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गाळ्यांची बांधणी केली आहे. मात्र खासगी व्यावसायिक इमारतीमध्ये गाळ्यांचे दर कमी आहेत. त्या तुलनेत महापालिकेच्या गाळ्यांचे दर जादा असल्याची तक्रार ग्राहकांची आहे. महापालिका अधिनियमामध्ये मूल्यांकनापेक्षा कमी दरात जागा भाड्याने देऊ नये असे नियम आहे. त्यामुळे जागेचे भाडे कमी केले जात नाही. परिणामी हे गाळे भाडेतत्तवार देण्यासाठी काढलेल्या निविदांना प्रतिसाद मिळत नाही.

महापालिकेच्या गाळ्यांपेक्षा खासगी गाळे ग्राहकांना स्वस्त मिळतात असे ग्राहकांचे म्हणणे आहे. रिक्त गाळ्यांसाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हे गाळे भाडेत्त्वार देण्याचा विचार सुरू आहे. तसा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांना दिला जाणार आहे. मुकेश कोळप, प्रशासन अधिकारी, भूमि जिंदगी विभाग.

महापालिकेचे एकूण गाळे – 770
भाडेपट्टा करारावर दिलेले गाळे – 323
अल्प मुदतीसाठी भाड्याने दिलेले गाळे – 147
पालिका वापरत असलेले गाळे – 91
रिक्‍त असलेले गाळे – 209

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button