महापालिका महापाैरासह अन्य पदाधिका-यांची वाहने जमा
पिंपरी |महाईन्यूज|
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सोमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याची आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापाैरांसह अन्य पदाधिका-यांच्या वाहने जमा करण्यात आले. सभागृहासह दालनावरील महापुरुषांसह अन्य नावांच्या पाट्या झाकण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
राज्यातील पाच विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे. पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघातही निवडणूक होणार आहे. त्यामुळे पिंपरी- चिंचवड क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी शासकीय वाहने जमा करणे बंधनकारक आहे. महापालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता, प्रभाग अध्यक्ष, विविध विषय समित्यांच्या सभापतींना शासकीय वाहने दिली जातात. या पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहने जमा करणे बंधनकारक आहे.
सध्या महापौर, उपमहापौर, महिला व बालकल्याण समिती सभापती शासकीय वाहनाचा वापर करतात. त्यांनी वाहने जमा केली आहेत. तर, बाकीचे पदाधिकारी स्वतःचे वाहन वापरत असून इंधन पालिकेकडून घेत आहेत. त्यांनी खासगी वाहनावरील सभापतीपदाचा बोर्ड झाकणे बंधनकारक आहे. पालिकेतील दालनावरील पाट्या झाकल्या जाणार आहेत. 3 डिसेंबर 2020 पर्यंत आचारसंहिता आहे.