महापालिका उद्यानातून 11 चंदनाच्या झाडांची तस्करी, अज्ञाताविरोधात तक्रार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/7-7.jpg)
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या काळभोरनगर येथील शंकर शेट्टी उद्यानातून अज्ञात व्यक्तींनी आठ ते दहा वर्षांची असणारी 11 चंदनाच्या झाडांची तस्करी करण्यात आली आहे. याबाबत पालिका उद्यान विभागाकडून सदरील झाडांचा पंचनामा करुन मोहननगर पोलिस चाैकीत अज्ञाताविरोध तक्रार दाखल केली आहे.
काळभोरनगर येथील शंकर शेट्टी उद्यानात चंदनाच्या झाडे आहेत. सदरील झाडे ही साधारणता आठ ते दहा वर्षाच्या पुढील आहेत. त्या झाडावर अज्ञात व्यक्तींनी सोमवार (दि.9) मध्यरात्री तीन चंदनाची झाडे पुर्ण तोडली आहेत. तर आठ झाडे ही अर्धवट स्थिती कटिंग केलेली आहेत.
याबाबत महापालिकेचे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी महापालिका उद्यान विभाग आणि मोहननगर पोलिसांना माहिती दिली. त्यानूसार मोहननगर पोलिस चाैकीच्या पोलिसांनी सदरील झाडाचा पंचनामा केलेला आहे. याप्रसंगी महापालिका उद्यान विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते. सदरील झाडांची कत्तल करुन चंदन तस्कर करणा-यावर कडक कारवाई करावी, अशी राजू दुर्गे यांनी केली आहे.
![](https://i1.wp.com/mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/IMG-20191211-WA0004.jpg?fit=1024%2C474&ssl=1)
दरमान्य, मोहननगर पोलिसांनी चंदनाच्या झाडांची तस्करी करणा-या पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.