breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका आयुक्तांवर उपमुख्यमंत्री अजितदादाची ‘कृपादृष्टी’

कोरोनात चांगले काम केल्याने श्रावण हर्डीकरांना शब्बासकी थाप, बदली लांबणीवर पडली?

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांची बदली होणार असल्याची चर्चा गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. मात्र कोरोना महामारीत आयुक्तांनी चांगले काम केल्याने खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना शब्बासकीची थाप दिल्याने आयुक्तांची बदली लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती केली होती.

हर्डीकर यांनी महापालिकेचे सूत्रे हाती घेतल्यानंतर स्मार्ट सिटी, पाणी योजना, वाहतूक नियंत्रण आदी विकास कामांना गती दिली होती. त्यांचा अडीच वर्षाचा कालखंड पूर्ण झाल्यानंतर बदली होणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यापूर्वी सुरु आहे. तसेच राज्यात भाजपाची सत्ता असताना त्यांचे नाव फडणवीस यांचे विश्वासु अशी टीका केली जात होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आयुक्तांच्या विविध कामांच्या चाैकशी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, कोरोना कालावधीत पुण्यातील आयएएस अधिका-यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. परंतू, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आयुक्त हर्डिकरांना काम करण्याच्या सूचना केल्या आहेत.

मार्चपासून कोरोना सुरू झाल्याने त्यांची बदलीची चर्चा लांबणीवर पडली होती, कोरोनाच्या महामारीत हर्डीकर यांनी चांगले काम केल्याने उपमुख्यमंत्री यांनी अजित पवार यांनी हर्डीकर यांच्या कामाचे कौतुक केले आहे. मागील आठवड्यामध्ये पुण्यातील बैठकीमध्ये जे अधिकारी काम करणार नाही त्या अधिकार्‍यांवर कारवाई करणार असे निर्देश दिले होते. तर दुसरीकडे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना ‘तुम्ही काम करत राहा, अशी सूचना केली आहे. त्यामुळे हर्डीकर यांची बदलीची चर्चा लांबणीवर पडली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button