breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
‘मला तुम्हाला भेटायचं आहे’ अजित पवारानी केला शरद पवाराना फोन
पुणे |महाईन्यूज |प्रतिनिधी|
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली. त्यानंतर ते अज्ञातवासात असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आता अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अजित पवार यांनी फोनवरून शरद पवारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मला तुम्हाला फेटायचं आहे, असं शरद पवारांना सांगतलं. त्यावर शरद पवारांनी मुंबईत भेटू असं कळवल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच अजित पवार आणि शरद पवार या काका-पुतण्याची बैठक होणार आहे. त्यानंतर ते माध्यमांसमोर येणार आहेत.