breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मलनिःसारण नलिका साफसफाई मशीन खरेदी; ठेकेदार कंपनीवर स्थायी सभापती मेहेरबान

  • तीन क्षेत्रीय कार्यालयाचा एकाच ठेकेदाराला ठेका
  • राष्ट्रवादी नगरसेवकांचा मशीन खरेदीला विरोध

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महानगरपालिकेच्या अ, ब आणि क या तीन क्षेत्रीय कार्यालयातंर्गत मलनिस्सारण नलिका मॅकहोल चेंबर्सच्या साफसफाईसाठी अत्याधुनिक यांत्रिक पध्दतीने काम करण्यात येणार आहे. याकरिता जलनिःस्सारण विभागाने सात दिवसात निविदा प्रक्रिया राबवून तिन्ही ठेका एकाच कंपनीस देण्यात येणार आहे. या मशीन खरेदीस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. मात्र, नगरसेवकांचा विरोध डावलून स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी यांनी आज (शुक्रवारी) झालेल्या स्थायी समिती सभेत मान्यता दिली. तसेच मे.आर्यन पंप्स एॅण्ड एनव्हायरो सोल्यूशन्स कंपनीवर मेहेरबान दाखविली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जलनिस्सारण विभागाकडून मलनिस्सारण नलिका मॅनहोल चेंबर्सची साफसफाई आधुनिक यांत्रिकी पध्दतीने करण्यात येणार आहे. या कामासाठी अ, ब आणि क तिन्हीही क्षेत्रीय कार्यालयातंर्गत निविदा प्रक्रिया राबविली होती. या निविदा भरण्यासाठी अवघा सात दिवस मुदत देण्यात आली. त्यात मे. आर्यन पंप्स अॅण्ड एन्व्हायरो सोल्यूशन प्रा. लि. पुणे आणि मे. मेट्रो वेस्ट हॅण्डलिंग प्रा. लि. दिल्ली या कंपन्याच्या निविदा प्राप्त झाल्या. मात्र, सात दिवसानंतर फेरनिविदा काढण्यात आली. एका वर्षात तीन वेळा पुनःपुन्हा निविदा काढूनही त्याच ठेकेदारांकडून निविदा प्राप्त झालेली आहे.

या तिन्ही क्षेत्रीय कार्यालयासाठी आर्यन कंपनीची एकच निविदा प्राप्त झाली. या मशीन खरेदीसाठी प्रत्येकी 1 कोटी 29 लाख आणि प्रती दिन 43 हजार खर्चाची ही निविदा आहे.  ही कंपनी अटी-शर्थीत बसत असल्याचा दावा कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील आणि सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी केला आहे.  विशेषता संबंधित कंपनीबरोबर पुढील सात वर्षासाठी करारनामा करण्यात येणार आहे.

दरम्यान, सदरील मशीन खरेदीस राष्ट्रवादीचे नगरसेवक पंकज भालेकर, मयूर कलाटे आणि प्रज्ञा खानोलकर यांनी विरोधी दर्शविला आहे. एकाच ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून, निविदेसाठी सात दिवसाची मर्यादीत कालावधी राबवून ही खरेदी सुरु आहे. तसेच आणखी दोन क्षेत्रीय कार्यालयाचा जलनिस्सारण विभागाचे कामही देण्यात येणार आहे. त्या मशीन खरेदीच्या आरोपाकडे स्थायी सभापती विलास मडेगिरी डोळेझाक करुन सदरील खरेदीस मान्यता दिली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button