breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘मलई’साठी आरोग्य कार्यकारी अधिका-यांची किटकनाशक औषध खरेदी

एक कोटीच्या मुदतबाह्य संपलेल्या किटकनाशक औषधांची जबाबदारी कोणाची? कारवाईसाठी आयुक्तांच्या हाताला लकवा

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागाकडून 91 लाखांची कीटक व जंतूनाशके औषधांची खरेदी करण्यात येणार आहे. आरोग्य अधिका-याने स्वताःच्या मलईसाठी प्रभागांतील सहायक आरोग्य अधिका-यांकडून वाढीव कोटेशन मागून ही खरेदी करण्यात येवू लागल्याचा आरोप होवू लागला आहे. मात्र, एक कोटी एक लाख 60 हजारांची कीटक व जंतूनाशके औषधे कालबाह्य झाल्याने फेकून देण्यात आली. जनतेचा पैशा विनाकारण पाण्यात गेला. त्या औषधांची नेमकी जबाबदारी आरोग्य की भांडार विभागाची आहे. याबाबत संबंधित अधिका-यांवर जबाबदारी निश्चित करुन कडक कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंत रेगडे यांनी केली आहे.

महानगरपालिका आरोग्य कार्यकारी अधिका-यांच्या मागणीनुसार भांडार विभाग कीटक जंतूनाशके औषधांची खरेदी केलेली आहे. त्यात एक कोटी एक लाख 60 हजार रुपयांची औषधे मुदतबाह्य झालेली आहेत. याबाबत भांडार विभागाकडून वारंवार संबंधित आरोग्य कार्यकारी अधिकारी, सहायक आरोग्य अधिकारी यांना पत्राद्वारे कळविण्यात आले होते. तरीही त्याकडे संबंधित अधिका-याने दुर्लक्ष केले. त्यामुळे कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत. त्या मुदतबाह्य संपल्यामुळे फेकून दिलेल्या औषधाची जबाबदारी कोणाची आहे. त्यावर आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. यामुळे साशंकता निर्माण झालेली आहे.

महापालिका कार्यक्षेत्रात डास, डेंगीच्या अळ्या, कीटक, जंतू यांचा संहार करण्यासाठी कीटक-जंतू नाशके खरेदी केली जातात. गटार, नाले, स्वच्छतागृहे दुर्गंधीयुक्त परिसरात फवारणीसाठी कीटकनाशक पावडर, त्याचप्रमाणे स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठीही औषधे खरेदी केली जातात. मात्र, या औषधांच्या खरेदीनंतर त्यांचा वेळोवेळी वापर न केल्याने फेब्रुवारी २०१६ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत एक कोटी एक लाख साठ हजार रुपयांची कीटकनाशके कालबाह्य झाल्याने भांडार विभागात वापराविना पडून आहेत.

मध्यवर्ती भांडार विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे म्हणाले, ‘‘आरोग्य विभागाने मागणी केल्यानंतरच भांडार विभागाद्वारे कीटक-जंतुनाशके खरेदी केली जातात. त्यामुळे आरोग्य विभागाने मागविलेली औषधे नियोजित वेळेत उपयोग करणे गरजेचे आहे. भांडार विभागाद्व्रारे शिल्लक जंतू-कीटकनाशकाबद्दल वेळोवेळी आरोग्य विभागाशी पत्रव्यवहारही केला आहे.’’

वसंत रेंगडे म्हणाले की, आरोग्य अधिकारी केवळ खरेदी काढून मलई काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. सहायक आरोग्य अधिका-यांकडून वाढीव मागणी घेवून ही कीटक-जंतुनाशकाची खरेदी करु लागले आहेत. काहींची औषधांची मागणी नसताना आरोग्य विभागाच्या मागणीनुसार भांडार विभागाने औषधे खरेदी केल्याने ती औषधे मुदतबाह्य झाली आहेत. नुकतेच बॅक्‍टोडेक्‍स औषधांची खरेदी क्षेत्रीय कार्यालयांतील आरोग्य विभागाच्या २०१८-१९ साठी मागणी शून्य असताना ९१ लाखांची खरेदी करण्यात येवू लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button