Breaking-newsपिंपरी / चिंचवड

मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कारगिल विजय दिन उत्साहात साजरा

पिंपरी, (महाईन्यूज) – अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानच्या सैन्याला नेस्तनाबूत करून भारतीय सैनिकांनी विजय संपादन केल्याचा दिन म्हणजे कारगिल विजय दिन पिंपळे गुरव येथे उत्साहात साजरा करण्यात आला. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड शहरतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अमर जवान स्तंभाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि मेणबत्त्या पेटवून कारगील युध्दातील शहिद वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच, कारगील युद्धाच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. सर्व उपस्थितांनी सर्व जवानांच्या शौर्याला सलाम केला. मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दामोदर पतंगे, प्राचार्य गोरख घोडके, प्रा. अभयकुमार हिरास, भूगोल फाउंडेशन अध्यक्ष डॉ. विठ्ठलराव वाळूंज, शंकर तांबे, प्रकाश इंगोले, प्रीती काळे, समाजप्रबोधनकार शारदा मुंढे, साहेबराव गावडे, डी. एस. राठोड, राजेंद्र मोरे, शशिकांत दुधारे, रमेश जाधव, शिवलाल कांबळे, आण्णा जोगदंड, तसेच भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघ, संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघ, मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारगिल युद्ध भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न झाल्यानंतरचे पहिलेच युध्द होते. हिंदुस्थानी सैन्याने आपल्या प्राणाची बाजी लावून व साहसाचे प्रदर्शन करीत अति उंचावरच्या लढाईत भारताच्या अजेय शक्तीचे जगाला दर्शन घडविले. दक्ष राहण्याचा निश्चय हीच त्या संग्रामातील हुतात्मांना आदरांजली आहे, असे डॉ. दामोदर पतंगे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सचिव सूर्यकांत कुरुलकर यांनी केले. तर, आभार प्रकाश इंगोले यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button